नाशिकच्या रस्त्यांची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करा!

रस्त्यांच्या दुरावस्थेवरून माजी महापौर दशरथ पाटील उतरले रस्त्यावर
Dashrath Patil, Ex. Mayor
Dashrath Patil, Ex. MayorSarkarnama

नाशिक : साडेसहाशे कोटी रुपये खर्च करूनही पावसाळ्यात शहरातील (Nashik) रस्त्यांची दैना झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी महापौर दशरथ पाटील (Dasharath Patil) हे रस्त्यांचा पंचनामा करण्यासाठी थेट रस्त्यावर उतरले आहे. गुरुवारपासून सहा विभागात ते दौरा करणार असून, पश्चिम विभागापासून सुरू झालेल्या दौऱ्यावेळी त्यांनी रस्ते कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत रस्त्यांच्या चौकशीसाठी एसआयटी (SIT) नियुक्त करण्याची मागणी उच्च न्यायालयात (High court) केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Ex Mayor Dashrath patil will go to high court for road inquiry)

Dashrath Patil, Ex. Mayor
Shambhuraj Desai : "उद्धव ठाकरेंना मिळमिळीत बोलण्याची सवय म्हणून..." ; मंत्री देसाईंची टिका!

शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. मात्र, महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून रस्त्यांची दुरुस्ती होत नाही. ज्या ठिकाणी दुरुस्ती होत आहे, तेथे तात्पुरती मलमपट्टी केली जाते. रस्ते कामाच्या माध्यमातून नागरिकांच्या कररूपी पैशाची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी होत आहे.

Dashrath Patil, Ex. Mayor
Shraddha Walkar : पॉलीग्राफ टेस्टमध्ये आफताबला विचारण्यात आले 'हे' प्रश्न

या पार्श्वभूमीवर माजी महापौर पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. येत्या १ डिसेंबरला न्यायालया सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी ३० नोव्हेंबरपर्यंत रस्त्यांचा पंचनामा करण्याचा निर्णय पाटील यांनी घेतला. गुरुवारी महापालिका मुख्यालयापासून दौऱ्याला सुरवात झाली. दौरा करून नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या व प्रतिक्रिया विचारल्या.

तर मनुष्यवधाचा गुन्हा

उच्च न्यायालयात दावा दाखल असल्याने या दाव्याचा निकाल लागण्याअगोदर पाटील यांनी पंचनामा सुरू केला आहे. बांधकाम विभागाने ठेकेदारांना रस्ता दुरुस्ती करण्यासंदर्भात बजावलेल्या नोटिशीचा आधार घेत ३० नोव्हेंबर शहरातील रस्ते पूर्ववत न झाल्यास महापालिकेच्या बांधकाम गुणवत्ता व नियंत्रण लेखापरीक्षण व प्रशासनातील अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरवून देण्याचा इशारा देताना नादुरुस्त रस्त्यांमुळे अपघात होऊन बळी गेल्यास महापालिकेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू असा इशारा श्री. पाटील यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in