NCP; प्रत्येकाने ‘एक तास राष्ट्रवादी’ साठी उपक्रमात सहभागी व्हावे!

शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली.
Ranjan Thackerey in NCP meeting
Ranjan Thackerey in NCP meetingSarkarnama

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (NCP) ‘एक तास राष्ट्रवादी’ (Hour for NCP) साठी या उपक्रमांतर्गत झालेल्या बैठकीत विविध विषयावर चर्चा होऊन नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यात येतील, अशी माहिती नाशिक रोड (Nashik) राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे (Ranjan Thackerey) यांनी दिली. (NCP will straighten party organisation in city for NMC election)

Ranjan Thackerey in NCP meeting
Eknath Khadse; दूध संघांत गिरीश महाजनांची एंट्री खडसेंना परवडेल का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार एक तास राष्ट्रवादीसाठी या उपक्रमाअंतर्गत दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी बैठक घेण्यात येते. निवृत्ती आरिंगळे, नाशिक रोड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर कोरडे, नगरसेवक जगदीश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे शनिवारी बैठक झाली.

Ranjan Thackerey in NCP meeting
Uddhav Thackrey: लांबलेल्या महापालिका निवडणुकीचा ठाकरे गटाला धोका

बैठकीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम, सभासद नोंदणी, आगामी महापालिका निवडणूकपूर्व तयारीची आढावा घेण्यात आला. या वेळी वाढत्या महागाईबद्दल निषेध करण्यात आला. नाशिक रोड परिसरातील वाढती गुन्हेगारी व कायदा सुव्यवस्था पाळण्यासंदर्भात पोलिसांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले.

परिसरातील खड्डे, तसेच विविध समस्यांबाबत महापालिकेला निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. संजय सौदे, अजय बागूल, विशाल गुंजाळ, रूपेश थोरात, सुमीत अवचिते, सागर जाधव, करण मोरे, अन्वर सय्यद, गणेश बोराडे यांची विविध पदावर नियुक्ती केल्याचे नियुक्तीपत्र देण्यात आले.

या वेळी रमेश औटे, शांताराम भागवत, वसंत अरिंगळे, योगेश निसाळ, शेख नियामत, मंगेश लांडगे, चैतन्य देशमुख, प्रशांत वाघ, पवन कोरोटे, वसीम शेख, साहीर शेख, अभय खालकर, चंद्रकांत साडे, संजय पगारे, भगवान गिते, अजय बागूल, प्रकाश थामेत, सुरेखा निमसे, रूपाली पठारे, विद्या बर्वे, रूपाली तायडे, रितेश केदारे, स्वप्नील कासार आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com