प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी हीच शासनाची भूमिका

अतिवृष्टीत झालेल्या नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार करण्यात आला.
प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी हीच शासनाची भूमिका
Dada BhuseSarkarnama

नाशिक : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, व वेळोवेळी आलेली चक्रीवादळे यामुळे काही भागांत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ही शासनाची भूमिका असून जिल्ह्यातील एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येईल, असे यावेळी बोलताना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

Dada Bhuse
मालेगाव हिंसाचार; रझा ॲकॅडमीच्या मुख्य कार्यालयावर मध्यरात्री छापा

जिल्‍हा नियोजन समितीची बैठक जिल्‍हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात मंगळवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्‍या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी श्री. भुसे यांनी सुचना केल्या. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, कृषिमंत्री दादा भुसे, जिल्‍हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्‍हाधिकारी सूरज मांढरे, जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आदी उपस्‍थित होते.

Dada Bhuse
भुजबळ- कांदे वाद; निधी मंजूरीसाठी उपसमितीचे गठन करण्याच्या सूचना

या बैठकीत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आदिवासी उपयोजनेतील निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आदिवासी उपयोजनेंतर्गत २९०.९५ कोटी एवढा निधी मंजूर आहे. त्यातील ९२.६८ कोटी निधी शासनाकडून मिळाला आहे. त्यातील १७.८३ कोटी खर्च झाला आहे. उर्वरीत निधी लवकरात लवकर कसा मिळेल व आदिवासी उपयोजना क्षेत्र व उपयोजनेबाहेरील क्षेत्र येथील निधीअभावी थांबलेल्या कामांना चालना मिळण्यासाठी शासनाकडे आग्रही पाठपुरावा करण्यात यावा. यासोबतच वनविभागाला जास्तीत जास्त निधी विकासकामांना मिळाल्यास वनसंपदा व तेथील जीवसृष्टीच्या जतनासाठी ते फायदेशीर असल्याचे सांगितले.

बैठकीचे प्रास्तविक व मान्यवरांचे स्वागत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले. यावेळी झालेल्या चर्चेत उपस्थित सर्व आमदार, सदस्य व प्रमुख अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in