Mehboob Shaikh
Mehboob ShaikhSarkarnama

रोज महागाई वाढवणाऱ्या केंद्र सरकारला हिसका दाखवा!

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी ‘शरद युवा संवाद’ यात्रेत आवाहन केले.

घोटी : बेरोजगारी, (Unemployment) वाढती महागाई (Inflation) यावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपने (BJP) भोंग्याचे राजकारण, जातीयवादाचे राजकारण सुरू केले. राज्यात जातीयवाद, बेरोजगारी, टोकाची वाढती महागाई याला केंद्र सरकारच जबाबदार आहे. त्यांना सामान्यांचा हिसका दाखवावा लागेल, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख (Mehboob Shaikh) म्हणाले.

Mehboob Shaikh
विरोधकांकडून आरक्षण संपविण्याचा प्रयत्न!

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज घोटीत प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या उपस्थितीत ‘शरद युवा संवाद’ मेळावा राजाराम साळवी सभागृहात घेण्यात आला. माजी आमदार शिवराम झोले अध्यक्षस्थानी होते.

Mehboob Shaikh
संजय राऊत मंगळवारी मोठा बॉम्बस्फोट करणार!

युवकांचे संघटन व्हावे, युवक चळवळीत युवकांना सक्रिय करून घ्यावे, तसेच युवकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून शरद युवा संवाद यात्रा राज्यभर जात असून, राष्ट्रवादीचा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या इगतपुरी तालुक्यात या यात्रेत जिल्हा व तालुक्यातील सर्व आघाड्यांचे पदाधिकारी सहभागी झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामुळेच शेतकरी, कामगार, कष्टकरीवर्गाला न्याय मिळाला. सर्वसमाजाला सोबत घेऊन राज्यात सर्वसमावेशक काम शरद पवार यांनी केले. याच पार्श्वभूमीवर तालुका पातळीवरही सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हाती घेऊन सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते माजी आमदार शिवराम झोले यांनी व्यक्त केले.

श्री. शेख म्हणाले, की केंद्र सरकारने नेहमीच द्वेषाचे राजकारण केले. बेरोजगारी, महागाईवर भाजपने बोलावे. युवकांची माथी भडकवणे थांबवत विकासाच्या वाटेवरून जावे.

शरद युवा संवाद अभियानप्रसंगी कोंडाजी आव्हाड, माजी आमदार शिवराम झोले, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, बाळासाहेब गाढवे, उदय जाधव, सुनील वाजे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, रायुकाँ तालुकाध्यक्ष हरीश चव्हाण आदींनी मार्गदर्शन करून युवकांना सक्रिय करून घेऊन बळ देण्याचे आवाहन केले.

यावेळी महेश शिरोळे, फिरोज पठाण, केरूदादा खतेले, उमेश खातळे, जिल्हा सरचिटणीस सुधाकर जगताप, शिवा काळे, रुक्मिणी जोशी आदी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com