शिवसेनेने आरोप केलेल्या ‘त्या’ अभियंत्यांची ‘नगरचना’तून बदली

शिवसेना नगरसेवकाच्या आरोपानंतर आयुक्तांकडून सहा अभियंत्यांच्याही पदभारात बदल.
Jalgaon Municiple corporation
Jalgaon Municiple corporationSarkarnama

जळगाव : शिवसेना (Shivsena) गटनेते बंटी ऊर्फ अनंत जोशी (Anant Joshi) यांनी नगररचना विभागातील अभियंत्यावर (Town planning Engineer) अडीच लाखांची लाच (Bribe) घेतल्याचा आरोप केला होता. याची दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड (Commissioner Vidya Gaikwad) यांनी ‘त्या’ अभियंत्यांची नगररचना विभागातून पाणीपुरवठा विभागात बदली केली आहे. तर इतर सहा अभियंत्यांच्या पदभारातही बदल केले आहेत. (Jalgaon municiple corporation commissioner change portfolio of engineers)

Jalgaon Municiple corporation
काँग्रेस सोडणार का? सत्यजीत तांबेंचे भन्नाट उत्तर

महापालिकेच्या नगररचना विभागात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते बंटी जोशी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. बांधकाम मंजुरी देण्यासाठी नगररचना विभागातील अभियंत्याने आपल्याच पुतण्याकडून तब्बल अडीच लाख रुपये घेतल्याचा आरोप त्यांनी केला होता. या अभियंत्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. या प्रकरणी लेखी तक्रार आल्यास आपण चौकशी करून करवाई करू, अशी ग्वाही आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दिली होती.

Jalgaon Municiple corporation
माजी आमदार विनायक निम्हण यांच्या मातोश्री सावित्री निम्हण यांचे निधन!

आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी शुक्रवारी (ता. १८) रात्री उशिरा महापालिकेतील नगररचना व बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, त्यात अभियंत्यांचीही नगररचना विभागातून बदली केली असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्या अभियंत्याच्या नावाचा कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. बदली झालेले व पदभार बदलले अभियंता असे : बांधकाम शाखा अभियंता नरेंद्र जावळे यांच्याकडे बांधकामाच्या विभागाच्या अतिरीक्त कारभाराबरोबरच खेडी शिवाराच्या नगररचना विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे.

नगररचना विभागातील नगररचना सहाय्यक जयंत शिरसाट यांची पाणीपुरवठा विभागात बदली झाली असून, त्यांच्याकडे प्रभाग दोन, पार्ट ३,४,५ व पार्ट १६, १७ चा अधिभार देण्यात आला आहे. पाणीपुरवठा विभागातील शाखा अभियंता राजेंद्र पाटील यांची बांधकाम विभागात प्रभाग १२, १३, १४ चा कार्यभार देण्यात आला आहे. बांधकाम विभागाचे योगेश वाणी यांच्याकडे बांधकाम प्रभाग १२, १३, १४ चा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. बांधकाम विभागाचे शाखा अभियंता प्रकाश पाटील यांच्याकडे बांधकाम विभागात प्रभाग ६.७ व १६ चा कार्यभार देण्यात आला आहे. नगररचना विभागाचे सर्वेअर योगेश वाणी यांच्याकडे बांधकाम विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

नगररचना विभागाचे सर्वेअर समीर बोरोले यांच्याकडील बांधकाम विभागाचे काम काढून त्यांना नगररचना विभागाचा मेहरूण शिवार देण्यात आला आहे. बांधकाम विभागातील शाखा अभियंता जितेंद्र रंधे यांच्या बांधकाम विभागातील १,२,३, प्रभाग १७ चा अतिरिकत कार्यभार देण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com