अतिक्रमण प्रश्नावर दादा भुसेंचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन

गायरानवरील अतिक्रमणधारकांत उद्रेक, पालकमंत्र्यांना घेराव, जिल्हाभर आंदोलन
Dada Bhuse with womens delegation
Dada Bhuse with womens delegationSarkarnama

सिन्नर : नगरपरिषद हद्दीतील (limits of municipality) गायरान व शासकीय जागेवरील (Government Land) सुमारे ४११ अतिक्रमणधारकांना नगरपरिषदेने (Sinner) अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात नोटिसा बजावल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत. यासाठी अतिक्रमणधारक महिलांनी शहरात एका कार्यक्रमासाठी आलेल्या पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना घेराव घालत अतिक्रमण मोहिम थांबवण्याची मागणी केली. (Encroachment holder womens seige Guardian minister Dada Bhuse in Sinner)

Dada Bhuse with womens delegation
माजी आमदार विनायक निम्हण यांच्या मातोश्री सावित्री निम्हण यांचे निधन!

नगर परिषदेकडून दहा दिवसांच्या आत अतिक्रमण काढून न घेतल्यास नगरपरिषद अतिक्रमण काढणार असून त्यावर होणारा खर्च संबंधितांकडून वसूल करणार असल्याचे नोटीशीत म्हटले आहे.

Dada Bhuse with womens delegation
काँग्रेस सोडणार का? सत्यजीत तांबेंचे भन्नाट उत्तर

शहर व परिसरात शासनाच्या नावे दाखल असलेल्या जमिनीवर बऱ्याच नागरिकांनी वर्षानुवर्षे अनधिकृतपणे कब्जा करून अतिक्रमण केलेले आहे. शासनाकडे विहित असलेल्या कोणत्याही जमिनीचा अनधिकृतपणे भोगवटा करणाऱ्या व्यक्तीस निष्कसित करण्याची तरतूद कायद्यात आहे. मुंबई उच्च न्यायालयानेच यासंदर्भाने आदेश पारित केलेले असल्याने राज्यभरात अतिक्रमणधारकांविरुद्ध कारवाई होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपरिषदेने कारवाई सुरु केली आहे, या ४११ अतिक्रमणधारकांना नोटिसा दिल्या आहेत.

यामुळे एका कार्यक्रमासाठी आलेल्या मंत्री भुसे यांना अतिक्रमणधारक महिलांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेराव घालत मागण्यांचे निवेदन दिले.भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब हांडे यांनी अतिक्रमण हटाव कारवाईविरुद्ध लढा उभा करत अतिक्रमणधारकांना एकत्र केले.

श्री. भुसे यांना निवेदन देत ही मोहिम स्थगित करण्याची मागणी त्यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी हांडे यांनी फोनवर चर्चा केली. त्यावर गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटाव कारवाईस सध्या स्थगिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती हांडे यांनी दिली. श्री. भुसे यांनीही यावर तोडगा काढण्याचे आश्वासन महिलांना व भाजप पदाधिकाऱ्यांना दिले.

यावेळी चंद्रकला सोनवणे, उषा कराड, पांडू पाटोळे, नाना बाबर, महेश गुजराथी, रवी नाठे, डॉ. विशाल क्षत्रिय, दर्शन भालेराव, कमलेश ठोक, गणेश क्षीरसागर, राहुल भालेराव, राहुल सानप, राधाबाई बहल, जयश्री गायकवाड यांच्यासह मोफतनगर, खळवाडी, एकतानगर, अपना गॅरेज झोपडपट्टी, आंबेडकरनगर भागातील अतिक्रमणधारक उपस्थित होते.

----

आम्ही गेली ३५-४० वर्षांपासून येथे राहत आहोत. आमच्या मुला-मुलींचे लग्नही येथेच झाले. आम्हाला शेतीवाडी नाही. उत्पन्नाचे शाश्वत साधन नाही. शासनाने आमची राहण्याची पर्यायी व्यवस्था करावी, जेणेकरुन आमचे कुटुंब रस्त्यावर येणार नाही. आमचा संसार घेऊन आम्ही कुठे जायचे?.

- ताराबाई शिरसाठ, सिन्नर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in