Graduate Constituency Election : हे काय ग्रामपंचायतीचं इलेक्शन नाही; शुभांगी पाटलांना निवडणूक अधिकाऱ्यांनी रोखलं

Shubhangi Patil News : संगमनेर येथील मतदान केंद्रावर शुभांगी पाटील पोहचल्या, अन्...
Shubhangi Patil
Shubhangi Patil Sarkarnama

Sangamner News : नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. खरं तर नाशिक पदवीधरची ही निवडणूक सुरुवातीपासून चर्चेची ठरली.

असे असतानाच आज महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) पाठिंबा दिलेल्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना निवडणुकीच्या कामासाठी तैनात असलेल्या अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या कारणास्तव मतदान केंद्रांवर हटकलं. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना हात जोडत बाहेरचा रस्ता धरला.

Shubhangi Patil
Satyajeet Tambe News : सत्यजीत तांबेंनी भाजपात यावं; भाजपच्या मोठ्या नेत्यांने दिली पक्षप्रवेशाची ऑफर

संगमनेर (Sangamner) येथील मतदान केंद्रावर शुभांगी पाटील आज दुपारी पोहचल्या. यावेळी त्या मतदारांच्या गाठीभेटी घेत असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी पाहिले. यावेळी असं न करण्यास सांगत निवडणूक अधिकाऱ्यांनी शुभांगी पाटील यांना रोखले. तसेच मतदान केंद्रात प्रचार करत असल्याचा आक्षेप अधिकाऱ्यांनी घेत पाटील यांना परिसरातून बाहेर जाण्याच्या सूचना केल्या.

Shubhangi Patil
Shivsena Symbol News : ठाकरेंनी आयोगात केली शिंदेंची कोंडी; लेखी युक्तीवाद सादर करत उपस्थित केला महत्त्वाचा मुद्दा

यावेळी पाटील आणि मतदान केंद्र अधिकारी यांच्यामध्ये चर्चा झाली. यानंतर अधिकाऱ्यांनी पाटील यांना तुम्ही नियमांचा भंग करत आहात. ही ग्रामपंचायत स्तरावरील निवडणूक नाही, असे सुनावले. त्यावर शुभांगी पाटील यांनी त्यांच्या समोर हात जोडत बाहेरचा रस्ता धरला.

Shubhangi Patil
Pankaja Munde News : भाजपच्या जवळ आलेल्या क्षीरसागरांना मुंडेंचा नमस्कार `स्वागता`चा कि `रामराम`चा..

दरम्यान, यानंतर शुभांगी पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच आपल्याला कोणीही रोखले नाही, असे स्पष्टीकरण दिले. शुभांगी पाटील म्हणाल्या, ''मला हात जोडायची सवय असून मला मतदान केंद्रात केणीही रोखले नाही. तर मी स्वत:हून कामकाज पाहून बाहेर आले'', असा दावा शुभांगी पाटील यांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com