बाजार समिती निवडणुकीत मतदान कोण करणार हे तर सांगा!

कोरोना महामारीच्या कालावधीत अनेक ग्रामपंच्यातींच्या सदस्यांचा संपला.
Harishchandra Chavan, MP
Harishchandra Chavan, MPSarkarnama

नाशिक : कोरोना महामारीच्या कालावधीत अनेक ग्रामपंच्यातींच्या सदस्यांचा कार्यकाळ संपला. (Government appoint administrator in village panchayat where terms complete in covid19 epidemic) तेथे शासनाने प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नुकत्याच जाहीर झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीत कोण मतदान करणार (Who will be the voter for APMC) हा गोंधळ निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाने त्याबाबत स्पष्ट निर्देश द्यावेत अशी मागणी माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण (Harischandra Chavan) यांनी केली आहे.

Harishchandra Chavan, MP
तुकाराम मुंडेंनी वाढविलेली घरपट्टी, पाणीपट्टी शिवसेना रद्द करणार!

यासंदर्भात माजी खासदार चव्हाण यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. पुणे येथील राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्तांना देखील त्यांना पत्र लिहून याबाबत स्पष्ट निर्देश देण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की. प्राधिकरणाकडून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र नाशिक जिल्ह्यातील चाळीस टक्के ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमलेले आहेत. मागील सहा महिन्यापूर्वी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचे कोणते सदस्य निवडणूकीत मतदान करू शकतील व कसे? निवडणूक आदेशात याचा स्पष्ट उल्लेख दिसत नाही.

गेल्या सहा महिन्यापूर्वी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांना निवडणूकीत मतदार समजण्यात यावे. तसे शासकीय नियमात नसेल तर तूर्तास कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडणूकांना स्थगिती देण्यात यावी. निवडणुका होईपर्यंत बाजार समित्यांवर प्रशासक नेमण्यात यावेत. अन्यथा बाजार समित्यांच्या निवडणुकीवर त्याचा निश्चितच परिणाम होईल. अनेक ग्रामपंचायत सदस्यांवर अन्याय होऊन ते आपल्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहतील.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com