MVP Election: प्रविण जाधव यांच्या समर्थकांनी महिलांना घराबाहेर ओढून मारहाण!

दिंडोरी येथे निवडणुकीतील विजयी उमेदवारांच्या समर्थकांकडून महिलांना मारहाण करीत विनयभंग केला.
Womens beaten by Elected candidate
Womens beaten by Elected candidateSarkarnama

नाशिक : मराठा विद्याप्रसारक समाज (MVP) संस्थेच्या निवडणुकीतील विजय काही उमेदवारांच्या डोक्यात शिरल्याचे चित्र आहे. दिंडोरीतील विजयी उमेदवार प्रविण जाधव (Pravin Jadhav) यांच्या समर्थकांनी संस्थेच्या शिक्षणाधिकाऱ्यांची आई, व भावजयीला घरात घुसून बेदम मारहाण केली. या महिलांचा विनयभंग करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. (MVP election result`s aftermath coming in dindori)

Womens beaten by Elected candidate
ED : घोडा, मांजरी, दागिनेच नव्हे तर सुकेनने जॅकलिनसाठी खरेदी केले होते घर..

मविप्र संस्थेच्या निकालाचे पडसाद दोन दिवसांपासूनच उमटू लागले होते. विजयी झालेल्या पॅनेलने आपल्या प्रचारातून वैद्यकीय विभागाचे शिक्षणाधिकारी नानासाहेब पाटील यांना लक्ष्य केले होते. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर राजीनामा दिला होता.

Womens beaten by Elected candidate
Cabinet Expansion : दुसऱ्या टप्यात सात कॅबिनेट तर १७ राज्यमंत्र्यांचा विस्तार, मुनगंटीवार म्हणाले...

मंगळवारी रात्री विजयी उमेदवार प्रविण जाधव यांनी मोहाडी गावात मिरवणूक काढली. यावेळी राजीनामा दिलेले शिक्षणाधिकारी नानासाहेब पाटील यांच्या मोहाडी येथील घरासमोर नवनिर्वाचित संचालक प्रवीण जाधव यांच्या समर्थकांनी नाचत घराच्या दरवाजावर लाथा मारल्या. घरात शिरून त्यांनी पाटील यांच्या मातोश्रींसह नातेवाइकांना मारहाण केली. या प्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीनुसार शिक्षणाधिकारी नानासाहेब पाटील यांच्या मातोश्री मीराबाई श्रीपत पाटील यांनी दिंडोरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्या व त्यांच्या स्नुषा सारिका घरात असताना गावातील प्रवीण जाधव ‘मविप्र’च्या निवडणुकीत विजयी झाल्याने त्यांचे समर्थक कार्यकर्त्यांनी विनापरवानगी डीजे लावत मिरवणूक काढत आपल्या घरासमोर नाचत होते. त्यातील काहींनी दरवाजावर लाथा मारल्या. आपण दरवाजा उघडला असता शिवीगाळ करत घरात प्रवेश करून मारहाण करीत विनयभंग केला.

तक्रारीत संशयितांमध्ये चेतन शरद जाधव, प्रतीक रामराव जाधव, सचिन पुंडलिक जाधव, निखिल माधवराव जाधव, सुनील अशोकराव जाधव, धनंजय विठ्ठल जाधव, राहुल आबासाहेब जाधव, शशिकांत उत्तम जाधव यांची नावे आहेत. दिंडोरी पोलिस ठाण्यात या संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहेत.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in