एकनाथ खडसेंवर 'ठाण्या'त उपचार करा ; गिरीश महाजनांचा टोमणा

''राज्यात तुमचेच सरकार असून याच सरकारने दिलेली चाचणी खोटी आहे हे त्यांनी सिध्द करावी, अथवा याबाबत तक्रार करावी'' असे खुले चॅलेंज देखील त्यांनी केले आहे.
Eknathrao Khadse, girish mahajan
Eknathrao Khadse, girish mahajansarkarnama

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपाचे नेते गिरीश महाजन (girish mahajan) यांची कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह आल्यानंतर मोक्काच्या धाकाने त्यांना कोरोना झाला असावा, असा संशय व्यक्त केल्याने महाजन यांनी खडसेंच्या प्रतिक्रियेचा समाचार घेतला आहे. यावरून त्यांनी एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

''ईडीच्या धाकाने एकनाथ खडसे हे चार वेळा कोरोना बाधीत झाले. अपंगाचे खोटे प्रमाणपत्र काय काढले, त्या प्रकरणी दिव्यांग बांधवांनी त्यांच्याविरूध्द आंदोलने केली. आता ते मोक्काच्या धाकाने आपल्याला कोरोना झाल्याचे म्हणत असले तर त्यांना खरोखर ठाण्याच्या उपचाराची गरज आहे,'', असा पलटवार भाजपचे नेते, माजी मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथराव खडसे यांच्यावर केला आहे. तर ''राज्यात तुमचेच सरकार असून याच सरकारने दिलेली चाचणी खोटी आहे हे त्यांनी सिध्द करावी, अथवा याबाबत तक्रार करावी'' असे खुले चॅलेंज देखील त्यांनी केले आहे.

 गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे हे स्वत: ईडीच्या उंबरठ्यावर आहे, सात महिन्यापासून जावई जेलमध्ये आहे. आता कोण आत जाते आणि कोण बाहेर जाते हे काळच ठरविणार आहे. मला कोरोना झाला याचे खडसेंनी फार बाऊ करून घेण्याची गरज नाही. माझ्यावर मोक्का लावण्यासाठी व खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी गृहमंत्र्यांवर दबाव काय आणता हा सर्व प्रकार जनतेला माहीत आहे. स्वत: खडसे ईडीच्या घेर्‍यात आहे त्यांनी मला शिकविण्याची आता गरज राहिली नाही. त्यांना खरोखर आता ठाण्यात उपचार घेण्याची गरज असल्याचे महाजन म्हणाले.

''राज्यात एकनाथराव खडसे यांच्या पक्षाची सत्ता आहे. मी माझ्या कोरोनाची चाचणी याच सरकारच्या लॅबमधून केलेली आहे. यात त्यांना काही शंका असेल तर त्यांनी आपल्याच सरकारच्या लॅबमधील रिपोर्टबाबत तक्रार करावी, अथवा याच्या सत्यतेची चौकशी करावी,'' असा सल्ला देखील महाजन यांनी खडसे यांना दिला आहे.

''महविकास आघाडी सरकार निष्क्रिय सरकार आहे. राज्यातील सरकार (Thackeray government) हे आजपर्यंतचे सर्वात निर्लज्ज आणि गेंड्याच्या कातडीला देखील लाजविनारे आहे,असा सणसणीत टोला गिरीश महाजन यांनी दोन दिवसापूर्वी लगावला. गिरीश महाजन म्हणाले, ''आज राज्यात विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत, सामान्य माणसाचे हाल सुरू आहेत. मंत्री केवळ आरेरावी करीत आहेत, जनतेचे मात्र हाल होत आहेत, त्यामुळे राज्यातील सर्व घटक तीव्र नाराज आहेत,''

Eknathrao Khadse, girish mahajan
ST कर्मचाऱ्यांसाठी शिवसेनेच्या आमदाराचा पुढाकार ; मुख्यमंत्र्यांना पत्र

''राज्यातील सर्वच प्रश्न या सरकारने वेशीला टांगले आहेत, त्यांना एसटी कामगारांचे प्रश्न दिसत नाहीत, या मंत्री मंडळातील कोणाशीही कोणाला काहीही देवघेण नाही,कोणताही मंत्री उपोषण करतो, आंदोलकांना जावून भेटत नाहीत,'' असा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे.

''विद्यार्थी, सामान्य माणसांचे हाल सुरू असून ग्रामीण भागातील रक्तवाहिनी एसटी बंद पडली आहे. मात्र, याबाबत राज्य सरकारला काही पडली. विजेचा प्रश्न, नोकर भरतीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न असेल, कुणाला काही पडलेले नाही, '' असे गिरीश महाजन म्हणाले.

Eknathrao Khadse, girish mahajan
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा अखेर रद्द

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in