एकनाथ शिंदेना समर्थन दिल्याने जिल्हाप्रमुखांना फरार व्हावे लागले?

धुळ्यात लावलेले समर्थनाचे बॅनर फाडले; मुख्यमंत्री ठाकरे समर्थकांची शक्ती प्रदर्शनातून भक्तीयात्रा
Shivsena leaders at party Office
Shivsena leaders at party OfficeSarkarnama

धुळे : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले. ४० हून अधिक आमदारांचा पाठींबा मिळवला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) अस्थिर झाले. यात फुटलेल्या आमदार मंजुळा गावित यांचे पतीच जिल्हाध्यक्ष असल्याने ते शिंदे गटात गेले. मात्र कार्यकर्ते पक्षातच असल्याने गावित यांना बॅनर लावणेही अवघड बनले आहे. शिवसेना (Shivsena) कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन करीत त्यांचा निषेध केला आहे. (Shivsena city chief abscond when shivsena mob made agitaion)

शिवसेनेत ठाकरे गट आणि बंडखोर शिंदे गट, अशी उभी फूट पडली आहे. त्याचे तीव्र पडसाद जिल्ह्यातही शुक्रवारी उमटले. शिंदे यांच्या समर्थनार्थ महानगरप्रमुख सतीश महाले यांनी शहरात ठिकठिकाणी लावलेले बॅनर शिवसेनेच्या मूळ संतप्त कार्यकर्त्यांनी टराटरा फाडले. तसेच जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित हे साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांच्यासह शिंदे गटात दाखल झाले आहेत.

एकीकडे महानगरप्रमुख, जिल्हाप्रमुखांनी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असताना ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिंदखेडा व शिरपूर विभागाचे सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी यांनी शक्तीप्रदर्शनातून शहरात भक्तीयात्रा काढली. मात्र, याविषयी काहीही माहीत नाही, निमंत्रण नाही, वरिष्ठांच्या आदेशाशिवाय ही यात्रा निघाल्याचे धुळे व साक्री विभागाचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री यांनी सांगितल्याने या पक्ष पातळीवर गोंधळ, संभ्रमाची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. या सर्व घडामोडीत पक्षात उभी फूट पडल्याचे मानले जाते.

माळी यांची भूमिका

शिवसेनेला बंडाची स्थिती नवीन नाही. अशी कितीही वादळे आली आणि गेलीत तरी शिवसेना आणि ठाकरे हेच एक वादळ आहे. महानगरप्रमुख आणि जिल्हाप्रमुख हे बंडखोर शिंदे गटात दाखल झाल्याने शिवसेनेचे काहीही बिघडणार नाही. मात्र, फरार जिल्हाप्रमुख आणि महानगरप्रमुखांची राजकीय पातळीवर राखरांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी यांनी दिला. त्यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या समर्थनार्थ भक्तीयात्रा निघाली. आम्ही पक्षप्रमुख ठाकरे यांच्यासोबत आहोत, असे म्हणत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आले शंभर, गेले शंभर, उद्धव ठाकरे एक नंबर यासह विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com