Shivsena News; अडीच वर्षे मंत्र्यांनाही वर्षावर प्रवेश नव्हता!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची धुरा हाती घेतल्यानंतर महाराष्ट्रातील पहिली युवती सेनेची शाखा सुरु केली.
Dr. Shrikant Shinde
Dr. Shrikant ShindeSarkarnama

नाशिक : (Nashik) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना (Shivsena) पक्षाची धुरा हाती घेतल्यानंतर प्रथमच नाशिक शहरात महाराष्ट्रातील पहिली युवती सेनेच्या शाखेचे उद्‌घाटन खासदार श्रीकांत शिंदे (Shreekant Shinde) यांच्या हस्ते करण्यात आले. या शाखेमुळे शिवसेना तळागाळात रुजेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. (Youth will take shivsena organization in the grass rout level)

Dr. Shrikant Shinde
BJP News; भाजप म्हणते महापालिका प्रशासक ‘जबाब दो’

यावेळी खासदार शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार ऑनलाईन काम करणारे नव्हे, तर ऑफलाईन काम करणारे आहे. लोकांना या पक्षाविषयी अतिशय आपुलकी आहे.

मागच्या अडीच वर्षात राज्यातील जनतेने फक्त ऑनलाईन घोषणांचा पाऊस बघितला. आताचे सरकार प्रत्यक्ष कृतीतून कामे करत आहे. समृद्धी महामार्ग याचे चांगले उदाहरण आहे, अशी टीका त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

Dr. Shrikant Shinde
Nashik News; घोषणा फोल, एक कांदा देखील सरकारने विकत घेतलेला नाही!

पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये आले असताना खासदार शिंदे बोलत होते. ते म्हणाले, राजकारणाचा स्तर इतका घसरविला की, मुख्यमंत्र्यांचे चहापान, जेवणाच्या बिलांवरही आक्षेप नोंदविला जात आहे. अडीच वर्षांपूर्वी ‘वर्षा’वर मंत्र्यांनाही जाता येत नव्हते. आता प्रत्येकासाठी वर्षाचे दरवाजे खुले आहेत.

येथे आलेल्या प्रत्येकाच्या चहा-नाश्त्यासह जेवणाची व्यवस्था होते. त्यामुळे आता विरोधक मुख्यमंत्र्यांच्या जेवणाच्या खर्चाचेही राजकारण करीत आहेत. कर्जाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले. येत्या आठ दिवसांत महापालिका क्षेत्रात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.

Dr. Shrikant Shinde
ZP News; विजयकुमार गावित यांचा कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांना दणका!

पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, संपर्कप्रमुख संजय बच्छाव, सहसंपर्कप्रमुख राजू लवटे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रविण तिदमे, युवासेनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष आविष्कार भुसे, युवासेनेचे लोकसभा संपर्कप्रमुख योगेश बेलदार, जिल्हाधिकारी रूपेश पालकर, युवासेना युवती शाखेच्या पदाधिकारी व प्रभागातील नागरिक या वेळी उपस्थित होते.

माजी नगरसेविका तथा युवासेना युवती जिल्हाधिकारी हर्षदा गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वरुपा राऊत, अनुजा चव्हाण, हर्षदा दिवटे, स्नेहा शिरसाट, शितल भवर, प्राची पवार, साक्षी बोरसे, वैशाली पगार, वैशाली मंडलिक, स्वाती मुसळे यांनी संयोजन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com