Shivsena Shinde group News : ‘अयोध्या मे शंखनाद, आ रहे है एकनाथ’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारासंह अयोध्या दौऱ्यासाठी नाशिकचे नेते करताहेत नियोजन.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

CM Eknath Shinde Ayodhya visit news : उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून दोनदा अयोध्या दौरा करण्यात आला. त्याचे नियोजन नाशिकच्या शिवसेना नेत्यांनी केले होते. त्यानंतर आता शिवसेनेच्या शिंदे गटाकडून येत्या ९ एप्रिलला अयोध्येचा दौरा होणार आहे. त्याचे नियोजन देखील नाशिकच्या कार्यकर्त्यांवरच आले आहे. स्वतंत्र रेल्वेने हा प्रवास होईल. (Special Train will take 1300 Shivsena workers to Ayodhya)

शिवसेनेच्या (Shivsena) अयोध्या (Ayodhya) दौऱ्याच्या पुर्वतयारीसाठी आज नाशिकचे (Nashik) कार्यकर्ते रवाना झाले. शहरातून यंदाही स्वतंत्र रेल्वे आरक्षीत करण्यात आली आहे. त्या माध्यमातून १३००, तर शहरातूव ३ हजार कार्यकर्ते अयोध्येत होणाऱ्या महाआरतीमध्ये सहभागी होतील.

Eknath Shinde
Nashik News : सत्यजीत तांबेंचा औद्योगिक जागेसाठी नवा पर्याय!

शिवसेना एकसंघ असताना हिंदुत्वाच्या मुद्यावरून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे व रश्मी ठाकरे या ठाकरे कुटूंबियांनी अयोध्या दौऱ्याचे आयोजन केले. प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्याकडे त्याची जबाबदारी देण्यात आली होती. खासदार राऊत यांनी त्यावेळी नियोजनाची जबाबदारी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांवर सोपविली होती.

दौऱ्यासाठी वाहनांचे नियोजन करणे, पदाधिकारी- कार्यकर्ते जमविणे, भोजन व्यवस्था, रामलल्ला दर्शन तसेच शरयु नदीकाठी सायंकाळी होणाऱ्या आरतीमधील सहभाग साधु-संतांच्या भेटी आदींचे काटेकोर नियोजन पदाधिकाऱ्यांनी केले होते. त्यासाठी ते आठ दिवस अयोध्येत ठाण मांडून बसले होते.

Eknath Shinde
Vikhe Patil News : वाळू ठेकेदारांची राजकीय लॉबीपुढे अस्तित्वाचे संकट!

त्यानंतर सलग दुसरा अयोध्या दौरा निश्चित झाला. त्या वेळीदेखील मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेवून नाशिकच्या पदाधिकाऱ्यांवरच जबाबदारी सोपविण्यात आली होती. तो दौरादेखील यशस्वी पार पडला.

त्यानंतरच्या काळात राज्यात सत्तांतर घडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंद-फडणवीस सरकार सत्तेत आले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या राजकारण तापले आहे. भाजपकडून सातत्याने हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरपणे मांडला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे यांनी देखील महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर हिंदुत्वाची भुमिका मांडली. मनसेचे इंजिनही हिंदुत्वाच्या मार्गावर चालले आहे. आता सत्तेत सहभागी शिंदे गट देखील हिंदूत्वाच्या भुमिकेवर आक्रमक झाला असून, त्याचाचं एक भाग म्हणून ‘अयोध्या मे शंखनाद, आ रहे है एकनाथ’ या बॅनरखाली अयोध्या दौऱ्याचा प्रचार सुरू केला आहे.

Eknath Shinde
Mahavikas Aghadi Agitation News : स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ का देत नाही?

येत्या ९ एप्रिलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत दर्शन घेतील. त्यासंदर्भातील सर्व जबाबदारी नाशिकमधील पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, सचिव नरेश म्हस्के यांच्यासह जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रविण तिदमे, सुनिल पाटील, ॲड. अभय महादास अयोध्या दौऱ्याचे नियोजन करत आहे.

...

अयोध्या दौऱ्याचे अत्यंत काटोकोर नियोजन करण्यात आले आहे. नियोजनाची जबाबदारी आमच्यावर आली, हा आमचा सन्मान आहे. यंदाचा अयोध्या दौरा यापुर्वी झालेल्या दौऱ्यांपेक्षाही उजवा ठरेल. कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागले आहेत.

- भाऊसाहेब चौधरी, संपर्कप्रमुख, शिवसेना (शिंदे गट).

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com