दादा भुसेंच्या वाढदिवसाला एकनाथ शिंदेंनी मंजूर केली सव्वाशे कोटींची कामे!

कृषिमंत्री दादा भुसे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे. आमदार सुहास कांदे यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले.
Dada Bhuse birthday celibration
Dada Bhuse birthday celibrationSarkarnama

मालेगाव : मालेगावला (Malegaon) पाणीपुरवठा, रस्ते व इतर कामांसाठी त्यांनी सादर केलेला १२५ कोटीचा प्रस्ताव नगरविकास (Urben devolopment) विभागाकडून मंजूर करत भुसे (Dada Bhuse) यांना वाढदिवसाची अनोखी भेट देत असल्याचे प्रतिपादन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रविवारी सांगितले.

Dada Bhuse birthday celibration
रेल्वे, विमाने गेली, आता `बीएसएनएल`तरी वाचवा!

श्री. भुसे यांचा वाढदिवस काल शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साजरा झाला. यावेळी ते म्हणाले, राज्यातील बळीराजा सक्षम व्हावा. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे, यासाठी अहोरात्र झटणारे कृषीमंत्री दादा भुसे नवनवीन प्रयोग करीत आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना प्रोत्साहित करीत आहेत. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी त्यांचे अविरत प्रयत्न सुरु आहेत. कृषी विभागासारखे अत्यंत संवेदनशील खाते दादा भुसे जबाबदारीने व सक्षमपणे सांभाळीत आहेत.

Dada Bhuse birthday celibration
जयंत पाटील सिद्धार्थ कांबळेंच्या केसांच्या फुग्यावर हात फिरवतात तेव्हा!

श्री. शिंदे पुढे म्हणाले, की सध्या नैसर्गिक आपत्तीची संकटे वारंवार येत आहेत. अशावेळी स्वत:च्या प्रकृतीचा विचार न करता दादा भुसे राज्यभर हजारो किलोमीटरचा प्रवास करीत आहेत. गारपीट, अतिवृष्टी, दुष्काळ प्रत्येक संकटाला शेतकऱ्यांच्या मदतीला ते धावून जातात. त्यांचे कामकाज उत्कृष्ट आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन व मदतीचे काम त्यांनी चोख बजावले आहे. मालेगावसाठीचा सव्वाशे कोटीचा प्रस्ताव नगरविकास विभागाने मंजूर केल्याचे त्यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला.

समर्पित भावनाने काम करीन

श्री. भुसे म्हणाले, की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कामे मार्गी लागले आहेत. मालेगावात महिला व बाल रूग्णालय शहर व तालुक्यासाठी वरदान ठरले आहे. शेती महामंडळाच्या ८६३ एकर जमिनीवर औद्योगिक वसाहत कार्यान्वित होत आहे. आगामी काळात शिवसेना याच समर्पित भावनेने विकासकामे करेल. मला येथील जनतेने, शिवसेनेने भरभरून प्रेम दिले. मालेगावच्या विकासात २०२२ हे वर्ष सुवर्ण अक्षराने लिहिले जाईल.

यावेळी आमदार सुहास कांदे, आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार अनिल कदम, माजी आमदार राजाभाऊ वाजे, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, उपमहापौर निलेश आहेर, माजी उपमहापौर सखाराम घोडके, आमदार मंजुळाबाई गावीत, विजय करंजकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड, तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव, बाजार समिती सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, रामा मिस्तरी, संजय दुसाने आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com