Eknath Shinde : "शिंदेनी नुसता दाढीवर हात फिरवला असता तर राऊत खासदारकीत आडवे झाले असते"

Eknath Shinde : संजय राऊत आडवा पडला असता.
Eknath Shinde | Sanjay Raut
Eknath Shinde | Sanjay Raut Sarkarfnama

जळगाव : "एकनाथ शिंदे यांनी नुसता दाढीवर हात फिरविला असता तर संजय राऊत खासदारकीच्या निवडणुकीत आडवा झाला असता, आज खासदारही राहिला नसता," अशा एकेरी शब्दात राऊतांवर खरमरीत टिका राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छत मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी जळगाव येथे हिंदू जनसंघर्ष समिती तर्फे आयोजित आक्रोश मोर्चात बोलताना केली.

जळगाव येथे हिंदू जनसंघर्ष समितीतर्फे आयोजित आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खासदार संजय राऊत टिका करीत आहेत, मात्र त्यांना आमचे एकच अवाहन आहे, जर राज्यसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी नुसता दाढीवर हात फिरविला असता, तर संजय राऊत खासदार झाला नसता. आडवा पडला असता. आज खासदारही राहिला नसता. त्यामुळे त्यांनी उगाच टिका करू नये.

Eknath Shinde | Sanjay Raut
Gulam Nabi Azad : आझाद यांचं बंड थंड : तब्बल १७ नेत्यांनी साथ सोडत, पुन्हा धरला काँग्रेसचा 'हात'!

यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले, पालकमंत्री या नात्याने हिंदू जनजागृती समितीतर्फे मागण्यांचे निवेदन घेण्यासाठी आलो आहे. अनेक पक्षांचे पदाधिकारी हिंदू ऐक्यासाठी एकत्र आले आहेत. जे मुस्लिम समाजबांधव आमच्यासोबत असतील, त्यांना आमचे सांगणे आहे. ‘इस देशमें रहेना होंगा तो वंदे मातरम कहना होगा’. आम्ही कोणत्या धर्माविषयी बोलत नाही. मात्र, आमच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले, तर आम्ही गांधीजी नाहीत, या गालात मारली तर दुसरा गाल पुढे करणार नाही, आम्ही जशास तसे उत्तर देवून हे लक्षात ठेवावे."

Eknath Shinde | Sanjay Raut
Ajit Pawar News : बारामतीत अजितदादांना प्रथमच प्रचंड सुरक्षा....; कारण काय?

"जनतेच्या आशीर्वादाने मी मंत्री झालो आहे.तीन पक्षाचे सरकार असते तर मी या व्यासपीठावर येवूच शकलो नसतो, कारण त्यावेळी या बाजूला कॉंग्रेस असती आणि एका बाजूला राष्ट्रवादी राहिली असती, आज एका बाजूला भाजप आहे, दुसऱ्या बाजूला सनातन आहे. चार महिन्यांपूर्वी गाडी बदलविली. ‘इस रूट की सभी लाइन व्यस्त है, सिधे गुवाहाटी. सत्तेसाठी सतराशे साठ, आमच्यासाठी एकच हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत," असे पाटील म्हणाले.

"हिंदू एकजुटीचे मी आभार मानतो. आमच्यावर मोठी टीका झाली. हिंदू समितीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे तिकडे बसले आहेत. सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी विधानसभेत आवाज उठवू, अशी ग्वाही देतो," असेही पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in