Eknath Shinde: गुलाबराव पाटील गुवाहाटीला कसे पोहचले? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

Eknath Shinde On Gulabrao Patil : सत्तेची हवा कधीच आमच्या डोक्यात जाणार नाही...
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Eknath Shinde On Gulabrao Patil News : राज्यात जून महिन्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता. यात महाविकास आघाडी सरकारवर तर कोसळलेच पण उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदार व १२ खासदारांनी उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली होती. यावेळी गुवाहाटी आणि तिथलं रेडिसन हाॅटेल चांगलंच चर्चेचा विषय ठरलं होतं.

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे( Eknath Shinde) यांनी गुलाबराव पाटील गुवाहाटीला कसे पोहचले याचा गौप्यस्फोट केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातार्याहून थेट जळगावला रवाना झाले होते. या अचानक केलेल्या जळगाव दौर्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा जोर धरु लागली असतानाच शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट देखील केला आहे.

Eknath Shinde
Amrit Sagar Milk election result : महाविकास आघाडीचा धुव्वा ; पिचड पिता-पुत्रांनी सत्ता राखली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे बडगुजर समाजाच्या अधिवेशनासाठी आले होते. यावेळी शिंदेंन पुन्हा एकदा गुवाहाटी प्रकरणावर भाष्य केलं आहे.

शिंदे म्हणाले, आम्ही गुवाहाटी येथे अनेक अडचणी पार करून गेलो. गुलाबराव पाटील यांना तर माझ्यासोबत येताना अडचणी खूप आल्या. ते कसे आले, ते मी सांगत नाही. गुलाबराव पाटील यांना तर अँब्युलन्समधून गुवाहाटी गाठावी लागली. आणि ते कसे आले याचे साक्षीदार गिरीश महाजन,मंगेश चव्हाण आहेत. त्यावेळी त्यांची तब्येत बरोबर नसतानाही मंत्री गुलाबराव पाटील यांना आणण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण, गिरीश महाजन यांनी प्रयत्न केल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. मात्र, जिद्द आणि चिकाटी असली की, ते ध्येय साध्य होतंच असेही शिंदे यावेळी म्हणाले.

Eknath Shinde
Eknath shinde : राज्यपालांचा आदेश डावलत, खोट्या कागदपत्रांद्वारे मुख्यमंत्र्याची फसवणूक?

त्यानंतर जे काय घडलं ते सर्व जगाला माहीत आहे आणि तेव्हापासून लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत लोकांना एकनाथ शिंदे कोण आहे हे माहीत झालं असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

यावेळी आम्ही धाडसानं निर्णय घेतले. पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचे निर्णय कोणी घेत नव्हतं. आम्ही केलं. आणि आम्ही नेहमी जमिनीवर राहून काम करणारे कार्यकर्ते आहोत. सत्तेची हवा कधीच आमच्या डोक्यात जाणार नाही असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या टीकेला प्रत्युत्तरही दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com