Shivsena News; गोळीबार प्रकरणी शिंदे गटाच्या नेत्याला अटक!

शिवजयंतीच्या वर्गणीचा हिशेब मागीतल्याने शिंदे गटाच्या लवटेंचा गोळीबार
Police at Deolali spot
Police at Deolali spotSarkarnama

नाशिक : (Nashik) येथील शिवजयंती उत्सव समितीची (Chhatrapati Shivaji Maharaj) बैठक काल (ता.19) सायंकाळी झाली. यावेळी एकनाथ शिंदे गटाचे संपर्क नेते राजू लवटे (Suryakant lawte) यांच्याकडे गतवर्षीच्या शिवजयंती वर्गणीचा हिशेब सादर करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. याचा राग आल्याने लवटे यांचे पुतने स्वप्नील लवटे यांनी अनधिकृत बंदुकीने गोळीबार केला. या घटनेने शिवसेनेचा (Shivsena) उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackrey) आणि शिंदे गटात (Eknath Shinde) तणाव निर्माण झाला. (Nashik police arrest Swapnil Lawte after registered a FIR)

Police at Deolali spot
Shivsena News; `भाजप`ला लायक उमेदवारही मिळत नाही

याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सागर किसन कोकणे यांच्या तक्रारीवरून एकनाथ शिंदे गटाचे संपर्कप्रमुख राजू लवटे यांचे पुतने स्वप्नील सूर्यकांत लवटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना पोलिसांवी अटक केली.

Police at Deolali spot
Shivsena News; शिंदे-ठाकरे गट भिडले, शिंदे गटाच्या कार्यकर्त्याचा गोळीबार?

यानिमित्ताने उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील समर्थकांत आज स्थानिक राजकारणावरून चांगलीच जुंपली. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने बाचाबाची झाली. त्यात शिंदे गटाच्या समर्थकाच्या मुलाने गोळीबार केल्याचे समजते. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण होते.

यासंदर्भात उपनगर पोलिस ठाण्यात तीन संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी सत्ताधारी पक्षाकडून पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करण्यात येऊन गुन्हेगारांचा बचाव तर निरपराध कार्यकर्त्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला.

शिवजयंती उत्सव समिती निवडीसाठी झालेल्या बैठकी दरम्यान शिवसेनेच्या ठाकरे व शिवसेनेच्या शिंदे गटात बाचाबाची झाली. या घटनेत एकाने हवेत गोळीबार केला. या घटनेनंतर परिसरातील दुकाने पटापट बंद झाली.

पोलिसांनी जादा कुमक मागवत परिस्थिती नियंत्रणात आणली. देवळाली गावातील गणेश मंदिर सार्वजनिक पार येथे आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. दरम्यान,रात्री देवळालीगावात दंगाविरोधी पथक दाखल झाले असून स्थिती नियंत्रणात आहे.

दोन्ही गट तलवारी कोयते, लाठ्याकाठ्या काढून एकमेकांवर धाऊन गेले. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला. या घटनेमुळे तणावाचे वातावरण तयार झाले नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

उपनगरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन चौधरी यांना माहिती मिळताच ते पोलिसांसह दाखल झाले. त्यांनी दोन्ही गटाला समजाविण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गटांनी आरोप- प्रत्यारोप केले. वाद व तणाव वाढतच गेल्याने सचिन चौधरी यांनी वरिष्ठांना कळवले. पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त सिध्देश्वर धुमाळ, उपनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक माईनकर, नाशिकरोडचे अनिल शिंदे, देवळाली कॅम्पचे कुंदन जाधव तातडीने दाखल झाले. काही राजकीय पक्षांच्या पदाधिका-यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला.

घटनेनंतर नागरिकांमध्ये भितीचे वातावरण दुकाने बंद झाली आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या देवळाली गावात काही दिवसांपूर्वी शिवसेनेत फूट पडली. काही पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेना गटात दाखल झाले. काही पदाधिकारी नुकतेच ठाकरे गटात दाखल झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते, याबाबत काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in