Eknath Shinde group; लोकसभेसाठी गोडसे, बोरस्तेंचे भवितव्य काय असेल?

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप शिंदे गटाला बरोबर घेण्याची शक्यता धुसर!
Eknath Shinde group
Eknath Shinde groupSarkarnama

नाशिक : राज्यात (Maharashtra) सत्ता स्थापनेनंतर नव्याने तयार झालेल्या राजकीय समीकरणाच्या अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Nashik) उमेदवाराची चाचणी शिंदे गटाकडून (Eknath Shinde group) सुरू झाले आहे. यात विद्यमान खासदार हेमंत गोडसे, (Hemant Godse) महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व नुकतेच प्रवेशकर्ते झालेले भाऊसाहेब चौधरी यांच्या नावाची चर्चा नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सुरू झाली आहे. (Hemant Godse, Ajay Boraste & Bhausaheb Choudhary`s name as expected Loksabha candidate)

Eknath Shinde group
Shivsena News; `कोणते` दहा नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर आहेत?

२०१९ पूर्वी राज्यात भाजप व शिवसेना युती अस्तित्वात होती. परंतु, शिवसेनेने भाजपशी फारकत घेत महाविकास आघाडीत प्रवेश करून सत्ता स्थापन केली. सव्वादोन वर्ष मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे राहिले. परंतु, जून २०२२ मध्ये राज्यात सत्तांतर घडले. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले. त्याचे फलित म्हणून शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आले.

Eknath Shinde group
Pension; देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' विधानानं शिक्षकवर्ग संतप्त; घेतला 'हा' मोठा निर्णय

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे-फडणवीस असा नवा राजकीय पॅटर्न महाराष्ट्राच्या राजकारणात उदयाला आला. त्यामुळे भविष्यात लोकसभा विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच पॅटर्ननुसार लढविल्या जातील. शिवसेनेची जागा भरून काढण्यासाठी शिंदे गटाला पुढे केले जात आहे. याचाच अर्थ यापूर्वी युती असताना शिवसेनेला ज्या जागा होतात, त्या जागांवर शिंदे गटाचे उमेदवार उभे राहतील.

त्याअनुषंगाने नाशिकच्या लोकसभा उमेदवारी संदर्भात चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरू होती. यात पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. राहुल ढिकले व चांदवड- देवळ्याचे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, शिंदे फडणवीस पॅटर्न अस्तित्वात आल्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा युती झाल्यास शिंदे गटाला सोडली जाणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा सुरू झाली आहे.

आमदारकीसाठी रान मोकळे

जातीय समिकरणांचा विचार करता नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये मराठा समाजाच्या उमेदवाराला राजकीय पक्षाकडून संधी मिळते. शिंदे गटाकडून लोकसभेसाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यासह मागील आठवड्यात शिंदे गटात प्रवेश केलेल्या माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या नावाची चर्चा आहे. त्याशिवाय आता शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांच्या नावाची भर पडली आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गटात गोडसे, बोरस्ते व चौधरी यांच्यातदेखील चुरस निर्माण झाली आहे. बोरस्ते यांच्या नावासाठी भाजपचे आमदारदेखील आग्रही असल्याचे बोलले जाते. जेणेकरून आमदारकीच्या स्पर्धेत शिंदे गटातून कोणी राहणार नाही.

शिवसेनेचेही चाचपणी

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेकडून चाचपणी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढल्यास व नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेस ऐवजी शिवसेनेकडे आल्यास येथून नवीन उमेदवार देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी स्वतःच उमेदवारी जाहीर केले असली तरी आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत होणाऱ्या पडझडीनंतरच निर्णय घेतला जाणार असल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com