नाशिकमध्ये शिंदे गटाच्या पडला ऐक्यात मिठाचा खडा?

पालकमंत्री दादा भुसे यांना डावलून खासदार हेमंत गोडसेंची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक
Hemant Godse & Dada Bhuse
Hemant Godse & Dada BhuseSarkarnama

नाशिक : राज्यात (Maharashtra) भाजपच्या (BJP) मदतीने सत्ता स्थापन केल्यानंतर शिंदे गटाकडून (Eknath Shinde Group) संघटना पातळीवर बळकटी आणण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न होत असताना नमनालाच नाराजीचे फटाके फुटताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाशिक (Nashik) संदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत खुद्द पालक मंत्र्यांनाच निमंत्रित केले न गेल्याने शिंदे गटात नाराजीचा स्फोट झाला आहे. (Eknath shinde group`s organisation & Office bearers unwillingness increase)

Hemant Godse & Dada Bhuse
राज्यपाल हटवा ठराव करणारे `हे` ठरले राज्यातील पहिले गाव!

जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला रामराम ठोकत ४० आमदारांच्या मदतीने भाजपसोबत सत्ता स्थापन केली, यात शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा आली. आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत मुख्यमंत्री शिंदे यांनी संपूर्ण राज्यात संघटना बांधणीचे प्रयत्न सुरू केले.

Hemant Godse & Dada Bhuse
ठेवी परत करण्यासाठी लवकरच पॅकेज देण्याचे आश्वासन

या प्रयत्नांमध्ये मुख्य म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेलाच सुरू लावण्याचा विडा उचलण्यात आला आहे. त्यासाठी खासदार आमदार यांच्या मदतीने शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना संघटनेत आणण्यासाठी प्रयत्न होत आहे. परंतु संघटना बळकटी सोडाच आहे त्या पदाधिकाऱ्यांमध्ये देखील आपसांत पटत नसल्याचे दिसून येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाशिकच्या प्रश्न संदर्भात मंगळवारी बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीला पालकमंत्री म्हणून दादा भुसे उपस्थित असणे गरजेचे होते. त्या व्यतिरिक्त शहरातील आमदारांना देखील बोलावणे आवश्यक होते. मात्र गुजरात मधील भाजपच्या प्रचारासाठी आमदार पोहोचल्याने त्यांना येता आले नाही मात्र त्यांच्यापर्यंत मुख्यमंत्र्यांसमोर बैठक असल्याचा निरोप देखील पोहोचला नाही ही बाब देखील महत्त्वाची आहे. दुसरीकडे खासदार हेमंत गोडसे व शिंदे गटाचे काही पदाधिकारी वगळता शासनातील अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

या संदर्भात दादा भुसे यांना विचारले असता बैठकीची आपल्याला कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. यावरून नाशिक मध्ये शिंदे गटात नाराजी असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी देखील नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत पालकमंत्री भुसे व खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. यावरून शिंदे गटातील सत्ता संघर्ष टोकाला पोहोचल्याचे दिसून येत आहे.

खासदार या नात्याने मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून नाशिकच्या प्रश्नासंदर्भात चर्चा करण्याची मागणी केली होती त्यानुसार आजची बैठक झाली. तातडीने बैठक बोलविण्यात आल्याने यात नाराजीचा प्रश्न निर्माण होत नाही. आमच्यात कुठलीही नाराजी नाही. नाशिकच्या विकासासंदर्भात आम्ही सर्व एकत्र आहोत.

- हेमंत गोडसे, खासदार, नाशिक.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com