Gulabrao Patil : पाच आमदार आले नसते तर माझा कार्यक्रम आटोपला असता ; बंडखोरीबाबत गुलाबरावांचा मोठा खुलासा

Gulabrao Patil : “उठावासाठी 38 आमदार लागणार होते. मी 33 वा होतो, 5 आमदार आले नसते तर माझा कार्यक्रम आटोपला असता”, असे ते म्हणाले.
Gulabrao Patil
Gulabrao PatilSarkarnama

Gulabrao Patil: राज्यात सत्तातर होऊन चार महिने झाले. त्यानंतरही या सत्तातरांबाबतच्या चर्चा थांबलेल्या नाहीत. शिवसेना फूटून ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरत-गुवाहाटीचा रस्ता धरला होता.

सत्तातरांच्या वेळी नेमक काय झालं ?, याबाबत शिंदे गटाचे नेते,पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे. जळगाव येथील एका कार्यक्रमात गुलाबराव पाटील बोलत होते. (mla Gulabrao Patil on Shiv Sena rebellion)

गुलाबराव पाटील म्हणाले, "आयुष्याचा सट्टा खेळून आम्ही भाजपकडे आलो. साधं सरपंचपद कोणी सोडत नाही. आम्ही 8 जणांनी मंत्रीपद सोडून दिलं होतं. आमची संख्या पूर्ण झाली नसती तर आम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली राहिली असती”,असे गुलाबराव पाटील म्हणाले.

“उठावासाठी 38 आमदार लागणार होते. मी 33 वा होतो, 5 आमदार आले नसते तर माझा कार्यक्रम आटोपला असता”, असे ते म्हणाले.

Gulabrao Patil
Bhagat Singh Koshyari :' साठी बुद्धी नाठी' ही म्हण अशा लोकांमुळेच पडली असेल..; नांदगावकरांचा हल्लाबोल

ठाकरे गटाचे सचिव मिलिद नार्वेकर, खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूच्या लोकांनी आम्हाला ‘दिखते हो शेर जैसे लगते हो चुहे जैसे’ असं म्हणून आम्हाला डिवचलं”, असं देखील गुलाबराव म्हणाले. “असं मरण्यापेक्षा शहीद झालो तरी चालेल अशी खून गाठ डोक्यात बांधत आम्ही बाहेर पडलो होतो”

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील मंत्री व आमदार यांची 21 तारखेला गुवाहाटीला (Guwahati) कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची चर्चा आहे मात्र 21 नोव्हेंबर ऐवजी लवकरच नवीन तारीख जाहीर होणार नवीन तारीख आल्यावर गुवाहाटी ला जाण्याबाबत निर्णय होईल," असे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in