गुलाबराव पाटलांचा करिश्मा कायम; शिंदे गटाला मिळाले पहिले सरपंच

Gulabrab Patil | Jalgaon | Eknath shinde | स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे देखील शिंदे गटाच्या वाटेवर
Gulabrao Patil
Gulabrao PatilSarkarnama

जळगाव : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात शिवसेनेत झालेल्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या बंडामुळे शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली आहे. ४० आमदारांना सोबत घेवून शिंदे यांनी भाजपाशी (BJP) युती करत राज्यात सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्री देखील झाले. सुरुवातीला शिवसेना आमदारांसोबत बाहेर पडलेल्या शिंदेंना हळूहळू राज्यभरातून नगरसेवक, पदाधिकारी आणि त्यानंतर खासदारांचाही पाठिंबा मिळाला आहे.

स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे देखील शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. अशात आता माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात शिंदे गटाला पहिले सरपंच मिळाले आहेत. त्यामुळे एका बाजूला शिवसैनिकांचा रोष सुरु असताना जळगाव जिल्ह्यातून मात्र एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा दिलासा मिळाला आहे.

राज्यात शिंदे गटाचा 'पहिला सरपंच' होण्याचा मान कुसुंबा ग्रामपंचायतीला (जिल्हा आणि तालुका जळगाव) मिळाला आहे. कुसुंबा ग्रामपंचायतीमध्ये (Kusumba Gram Panchayat) माजी मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या नेतृत्वात झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत यमुनाबाई हिलाल ठाकरे (Yamunabai Thackeray) या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. या पहिल्या निवडीमुळं शिंदे गटातील आमदारांचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in