Shivsena : जळगावमध्ये एकनाथ शिंदे गटाचाही डंका!

ग्रामपंचायत निवडणुकीत जळगावला शिवसेना ठाकरे गटानेही बरोबरीने जागा मिळविल्या.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या तेरा ग्रामपंचायत (Village Panchayat) निवडणुकीत तीन जागा पटकावून शिवसेना (Shivsena) शिंदे गटानेही (Shinde Group) आपला डंका वाजविला आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटानेही (Uddhav Thackray Group) त्यांच्या बरोबरीने तीन जागा मिळविल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसला (NCP) तीन जागा मिळाल्या आहेत. मात्र भाजप (BJP) व कॉंग्रेसला (Congress) एकही जागा मिळाली नसल्याचे दिसत आहे. (Shinde group wins on 3 Village grampanchayat election in Jalgaon district)

Eknath Shinde
NCP News: नरहरी झिरवळांनी दिंडोरीत राष्ट्रवादीचे वर्चस्व राखले

राज्यात सत्तांतरानंतर प्रथमच ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. जळगाव जिल्ह्यात चोपडा व यावल तालुक्यात एकूण तेरा ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. यात शिवसेना ३, शिवसेना शिंदे गट ३, राष्ट्रवादी कॉंग्रेस ३ व अपक्षांनी चार ग्रामपंचायतीत सरपंचपदी बाजी मारली आहे. भारतीय जनता पक्ष व कॉंग्रेसला एकाही ग्रामपंचायतीवर यश मिळाले नाही.

Eknath Shinde
Nana Patole: नोटबंदी हा जगातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे

जिल्ह्यात सरपंचपदी निवड झालेल्या ग्रामपंचायतीवरील पक्षनिहाय सरपंच असे : चोपडा : सत्रासेन- वंदना ज्ञानेश्‍वर भादले(राष्ट्रवादी), बोरमळी/देव्हारी-जुनाबाई किसन पाडवी(शिवसेना), मोहरद-अंजूम रमजान तडवी(शिवसेना शिंदे गट), वैजापूर-दत्तरसिंग सुभाष पावरा(शिवसेना शिंदे गट), कर्जाने-अलका सतीश बारेला(अपक्ष), पिंप्री- शिवाजी इंगळे (शिवसेना शिंदे गट).

अन्य ग्रामपंचायतींतील स्थिती अशी, उमर्टी-रिनेश रमेश पावरा (राष्ट्रवादी),मोरचिडा-हरिश्‍चंद्र सोनसिंग भादले(राष्ट्रवादी),कृष्णापूर-पिनबाई गेमा बारेला(शिवसेना ),बोअंजठी-शकुंतला धरमसिंग बारेला (अपक्ष), मेलाणे- लालबाई प्रताप पावरा(अपक्ष);यावल-मालोद रमाबाई भालसिंग बारेला (शिवसेना )परसाडे बुद्रूक-मीना राजू तडवी(अपक्ष).

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in