NCP News: एकनाथ शिंदे सरकारने महाराष्ट्राला धोका दिला

वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला हलविल्याच्या निषेधार्थ निफाड येथे राष्ट्रवादी कांग्रेसतर्फे तहसीलदारांनानिवेदन देण्यात आले.
NCP delegation
NCP delegationSarkarnama

निफाड : वेदांता (Vedanta) व फॉक्सकोन (Foxcon) प्रकल्प केंद्र शासनाने (Centre Government) गुजरातला (Gujrat) घेऊन जात महाराष्ट्रातील (Maharashtra) जनतेला धोका दिल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने (NCP) पंतप्रधान मोदींवर (Narendra Modi) हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निफाड तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्यात आली व तहसीलदार शरद घोरपडे यांना निवेदन देण्यात आले. वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. (NCP agitaion against Narendra Modi in Niphad)

NCP delegation
एकनाथ शिंदे अन् त्यांनी फोडलेल्या नगरसेवकांचा फैसला एकाच दिवशी?

वेदांता फॉक्सकॉन समूहाने सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर आता त्यावर राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. निफाडमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसने महसूल कार्यालयासमोर आंदोलन करत निदर्शने केली.

NCP delegation
Shivsena: हाकालपट्टी केलेले तिदमे म्हणतात, संघटनेचा अध्यक्ष मीच!

जवळपास एक लाख ५८ हजार कोटींचा हा प्रकल्प महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे होणार होता. मात्र अचानक हा प्रकल्प गुजरातला गेला. हा प्रकल्प महाराष्ट्रात झाला असता तर सुमारे एक लाख बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला असता. प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील राज्यातील युवकांना जो रोजगार मिळणार होता, तो आता मिळणार नाही, असे राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हा प्रकल्प गुजरातला हलविण्याच्या निषेधार्थ निफाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येथील तहसील कार्यालयासमोर घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले. या वेळी केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. तसेच शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात आली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, युवकचे प्रदेश सरचिटणीस, नगरसेवक सागर कुंदे, व्हीजेएनटी जिल्हाध्यक्ष शिवाजी ढेपले, सुभाष कराड, राजेंद्र बोरगुडे, शहराध्यक्ष तनवीर राजे, उन्मेष डुंबरे, प्रमोद जडे, माधव सुरवाडे, पुंडलिक बुटे, भाऊसाहेब मोगल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com