एकनाथ खडसेंच्या विजयाच्या खात्रीने गिरीश महाजन सावध झाले!

जळगावच्या राजकारणात सहा वर्षांनंतर नवा टर्निंग पाँईंट भाजपला अडचणीत आणणार?
एकनाथ खडसेंच्या विजयाच्या खात्रीने गिरीश महाजन सावध झाले!
Eknath Khadse & Girish MahajanSarkarnama

जळगाव : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या टार्गेटवर असल्याने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) गेली सहा वर्षे अडचणीत होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केल्यावर जळगावमध्ये भाजपच्या अनेक सत्तास्थानांना हादरे बसले. त्यामुळे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची देखील कोंडी झाली. आता श्री. खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्याने त्यांच्या पराभवासाठी गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. (Girish Mahajan`s political prestige is on test today)

Eknath Khadse & Girish Mahajan
खडसे समर्थकांकडून एक दिवस आधीच फटाक्यांचे बुकिंग

भोसरी जमीन प्रकरणाचा आरोप झाल्यानंतर श्री. खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ खडसे यांना गेली सहा वर्षे राजकीय संघर्ष करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांच्या यादीत त्यांचा समावेष केला. मात्र भाजपच्या खेळीने ती यादी अद्याप प्रलंबीत राहिली. भाजपने खडसे यांच्या मार्गात राजकीय काटे पेरले. त्यामुळे खडसे यांचा विजय झाल्यास सर्वाधीक धक्का भाजप व गिरीश महाजन यांना बसणार आहे.

Eknath Khadse & Girish Mahajan
महसूल कार्यालयावर आज `लाल वादळ` घोंगावणार!

आज होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणूकीत खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिल्यामुळे त्यांच्या राजकीय उत्कर्षाची पुन्हा आशा निर्माण झाली आहे. त्यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे. तब्बल सहा वर्षांनंतर ते गुलाल उधळणार काय याचा उत्सुकता आज शमेल. या निकालाने खानदेशचे राजकारण बदलणार आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसे यांच्या राजकीय जीवनात अनेक संकटे व प्रश्न निर्माण झाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारीही दिली नाही. त्यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली मात्र त्यांचा पराभव झाला. त्यामुळे राजकीय अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला होता.

श्री. खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांची ईडी चौकशी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी त्यांचे नाव दिले, मात्र राज्यपालांनी त्या यादीलाच अद्यापही मंजुरी दिली नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधान परिषद उमेवारी दिली; परंतु त्यात देखील भाजपने उमेदवार देऊन निवडणूक लादली. भाजपने एकनाथ खडसे यांचा पराभव करण्यासाठी त्यांना टार्गेट केले आहे.

...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा विधान परिषदेत विजय निश्‍चित आहे. विजयाचा गुलाल आम्ही निश्‍चित उधळणार आहोत. त्यामुळे खानदेशातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईला पोचत आहेत.

-ॲड. रवींद्रभय्या पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, जळगाव

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in