Eknath Khadse News : शिक्षक-पदवीधर निवडणुकीच्या निकालावरून खडसेंनी सत्ताधाऱ्यांना घेरलं; म्हणाले...

Maharashtra Politics : ''मी भाजप सोडली हेच भाजपच्या जिव्हारी लागलं''
Eknath Khadse
Eknath KhadseSarkarnama

Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निकालावरून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.

शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निकालावरून राज्यातील जनमत हे सध्याच्या सरकारविरोधी आहे हे स्पष्ट होत असल्याचं खडसे म्हणाले आहेत.

सर्व्हेवर आमचा विश्वास नाही, असं मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले होते. यावर बोलताना खडसे यांनी 'सर्वे झूठ है तो अभी जो निकाल हात में आया वो क्या है?' असा सवाल करत शिंदे-फडणवीस सरकारला घेरलं आहे. एकनाथ खडसे मुक्ताईनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

Eknath Khadse
BMC Budget 2023 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार; मुंबईकरांना काय मिळणार?

''मी भाजप सोडली हेच भाजपच्या जिव्हारी लागलं. त्यामुळेच भाजपवाले माझ्या नादी लागले. मला जेलमध्ये टाकाण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, मी काय केलं हे तरी सांगा? माझ्यामागे ईडी, सीबीआय लावली जाते,'' असा आरोपही यावेळी खडसे यांनी केला.

Eknath Khadse
IAS Promotion : शिंदे-फडणवीस सरकारनं सहा सनदी अधिकाऱ्यांबाबत घेतला मोठा निर्णय..

''विरोधी पक्षात दम नाही आम्हीच जुनी पेन्शन योजना लागू करू शकतो'', असं विधान फडणवीसांनी केलं होतं. यावर बोलताना खडसे म्हणाले, ''जनतेने फडणवीसांवर विश्वास ठेवला नाही. कारण नोकरदार आणि शिक्षकांना जुनी पेन्शन योजना हवी आहे. तसेच भाजपला नागपूरमध्ये जोरदार फटका बसला. फडणवीस आणि गडकरी यांच्या बालेकिल्ल्यातच भाजपचा पराभव झाला'', अशी टीकाही त्यांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com