एकनाथ खडसे विरुद्ध भाजप -शिंदेगट लढत रंगणार

जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ
Eknath Khadse & Girish Mahajan
Eknath Khadse & Girish MahajanSarkarnama

जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघाच्या (Jalgaon District Milk federation) संचालकपदाच्या निवडणुकीसाठी (Elections) दहा डिसेंबरला मतदान होणार आहे. अर्ज भरण्यास उद्या (ता.३) पासून प्रारंभ होणार आहे. त्यामुळे राजकीय (Political) वातावरण तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, (NCP) शिवसेना (Shivsena) व कॉंग्रेसची (Congress) महाविकास आघाडी विरुद्ध भाजप -शिवसेना शिंदेगट (BJP & Shinde group) युती अशी लढत होण्याचे संकेत आहेत. (Jalgaon District milk federation election process starts)

Eknath Khadse & Girish Mahajan
आमदार जयकुमार रावल यांना अटक करा!

एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी आज (ता.१) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली त्यात इच्छुकांनी अर्ज घ्यावे, असे ठरल्याचे सांगण्यात आले.

Eknath Khadse & Girish Mahajan
महापालिका रस्ते कंत्राटदारांना पाठीशी घालते काय?

जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी जाहीर केला. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी ३ ते १० नोव्हेंबरपर्यंत सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत आहे. वैध उमेदवारांची यादी १४ नोव्हेंबरला जाहीर करण्यात येईल. १४ ते २८ नोव्हेंबर उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. तसेच अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. उमेदवारांना चिन्ह वाटप २९ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. १० डिसेंबर रोजी सकाळ ८ ते ४ यावेळेत मतदान होईल. ११ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.

भाजप-शिवसेना शिंदे गट युती

जिल्हा दूध संघ निवडणुकीत प्रथमच भाजप -शिवसेना शिंदे गट युती एकत्र मैदानात उतरणार आहे. भाजपचे नेते राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व शिवसेना शिंदे गटाचे नेते राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे या गटाचे नेतृत्व करणार आहेत. भाजपतर्फे पक्ष कार्यालयात नुकतीच दूध संघाच्या निवडणुकीबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, खासदार उन्मेष पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, अरविंद देशमुख आदी उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

महाविकास आघाडी लढणार

राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व काँग्रेस अशी महाविकास आघाडी मैदानात उतरणार असल्याचे सांगण्यात आले. पक्षाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील मुक्ताईनगरातील निवासस्थानी बैठक घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, डॉ. संजीव पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, चाळीसगाव येथील प्रमोद पाटील आदी उपस्थित होते. एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वात लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घ्यावेत, असेही सांगण्यात आले.

जिल्हा दूध संघ निवडणुकीनिमित्ताने आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची आमदार एकनाथराव खडसे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना ठाकरे गट अशी महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ॲड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

...

भाजप व शिवसेना शिंदे गट युतीतर्फे निवडणूक लढविण्यात येणार आहे. पक्षाचे नेते राज्याचे मंत्री गिरीश महाजन व शिंदे गटाचे नेते जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविण्यात येणार आहे.

आमदार सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष, भाजप

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com