एकनाथ खडसेंनी दूध संघात निवडून येऊन दाखवावे

गिरीश महाजन म्हणतात खडसेंचे सर्व कारनामे लवकरच बाहेर येतील?
Eknath KhadGirish Mahajan
Eknath KhadGirish MahajanSarkarnama

जळगाव : राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी (NCP) कॉंग्रेसचे आमदार एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांनी जिल्हा दूध संघाच्या (Milk federation) यंदाच्या निवडणूकीत निवडून येऊन दाखवावे. त्यांचा पराभव अटळ आहे. त्यांचे कारनामे लवकरच बाहेर येतील, असे राज्याचे ग्रामविकास मंत्री व भाजप (BJP) नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पत्रकारांना सांगितले. (Girish mahajan given challange to NCP leader Eknath Khadse)

Eknath KhadGirish Mahajan
राज्याचे सहकार मंत्री नेत्यांसाठी की जनतेसाठी?

जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. त्यात एकनाथ खडसे यांच्या विरोधात भाजपचे मंत्री व विरोधक गिरीश महाजन तसेच भाजप व एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांनी मोर्चेबांधणी केली आहे.

Eknath KhadGirish Mahajan
जिल्हा बँक संचालकांच्या चौकशीला सहकारमंत्री पाटील यांची दुसऱ्यांदा स्थगिती

यासंदर्भात मंत्री महाजन जळगाव येथे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की एकनाथ खडसे यांनी अनेक कारनामे केले आहेत. त्यांनी आपल्यावर खोटा गुन्हाही दाखल केला आहे, असे अनेक कारनामे लवकरच बाहेर येतील.

एकनाथ खडसे यांनी कायद्याचा एवढा खोटा आधार घेतला आहे. आता आमची वेळ आली आहे. त्यांनी कायद्याला सामोरे जावे. जिल्हा दूध संघाचीही चौकशी सुरू आहे. त्यांनी पाच वर्षांत तेथे काय केले, काय नाही केले, हेही लवकरच जनतेसमोर येईल.

आम्ही त्यांच्यासारखा एकही खोटा गुन्हा दाखल करणार नाही. जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीबाबतही श्री. महाजन यांनी श्री. खडसे यांना आव्हन दिले. श्री. खडसे आमच्या उमेदवारांवर आक्षेप घेत आहेत. ते म्हणतील तो उमेदवार आपण त्यांच्याविरोधात देऊ. त्यांनी निवडून येऊन दाखवावे, असे खुले अवाहनही श्री. महाजन यांनी खडसे यांना दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in