शरद पवारांमुळे मी राजकारणात जिवंत

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची भाजपवर टीका
Eknath Khadse, Sharad Pawar
Eknath Khadse, Sharad Pawarsarkarnama

धुळे : राज्यात नवे सरकार येऊन काही दिवसच झाले. तोवर ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याचा न्यायालयीन निकाल आला. तेव्हा भाजपने आमच्यामुळे आरक्षण मिळाल्याचे ढोल बडवले. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ९२ पालिकांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC reservation) घ्याव्यात, असा आदेश दिला. त्याची जबाबदारी आता भाजपने (BJP) स्विकारून आमच्यामुळे आरक्षण गेल्याचा ढोल बडवावा, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकथान खडसे (Eknath Khadse) यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या दुर्लक्षामुळे हा निर्णय आल्याचा आरोप केला. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक हे सहन होत नाही, असेही ते म्हणाले.

येथील राष्ट्रवादी भवनाच्या नूतनीकरणाचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते झाले. आमदार खडसे, विधीमंडळाचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. आमदार खडसे म्हणाले, की सर्वच पक्ष नेते पवार यांचा सन्मान करतात. अशा उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या प्रेरणेतून संघटनात्मक बांधणी होऊ शकते.

Eknath Khadse, Sharad Pawar
कोश्यारींना परत बोलवा नाही तर राजभवनात घुसू : आव्हाड संतापले

मला भाजपने पाच ते सहा वर्षे दूर केले. सुडबुध्दीने चौकश्‍या लादत बदनामीचा प्रयत्न केला. माझ्या कारकिर्दीत अनेक विकास कामे झाली, संस्था उर्जितावस्थेत आल्या. त्यामुळे मी अडसर ठरू लागतो. त्यावेळी पवार यांनी आधार दिला आणि मी राजकारणात जिवंत राहू शकलो, असे खडसे म्हणाले.

अरूणभाईंनी घरा बाहेर पडावे

नव्या सरकारबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष असेल. निर्णय काय लागेल माहित नाही. मात्र, राज्याचे राजकारण वेगळ्या दिशेने जाईल. तेव्हा शरद पवार यांच्याशिवाय दुसरा कुणी नेता दिसणार नाही, असा विश्‍वास खडसे यांनी केला. राजकारणात पुढे जी पोकळी निर्माण होईल, ती राष्ट्रवादी काँग्रेस भरून काढेल यात शंका नाही.

पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत धुळे जिल्ह्यात तीन आमदार निवडून आणू, असा निर्धार व्यक्त केला. त्यावर अरूणभाई गुजराथी यांनी जळगाव जिल्ह्यात सहा आमदार निवडून आणावे लागतील, असा मनोदय व्यक्त केला. मात्र, चार आमदार निवडून येण्याची जळगाव जिल्ह्याची क्षमता आहे. त्यासाठी या जिल्ह्यातील पक्षाच्या सर्वांसह अरूणभाईंनी घराबाहेर पडले पाहिजे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे चांगले संघटन आहे. कार्यकर्ते एकत्र येताना दिसतात. मतभेदाचा विषय नसल्यासारखा आहे. फक्त जनतेचे ज्वलंत प्रश्‍न हाताळून, पक्षांतर्गत एकमेकांना विश्‍वासात घेऊन कार्य झाले, तर राष्ट्रवादीला निश्‍चितच चांगल्या जागा मिळतील, असेही खडसे म्हणाले.

Eknath Khadse, Sharad Pawar
आनंद दिघेंच्या पुतण्याचा एकनाथ शिंदेंना सवाल... तुम्ही 25 वर्षे गप्प का बसलात?

अरूणभाईंची भूमिका

अरूणभाई गुजराथी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बळकट केले तर महाराष्ट्र बळकट होईल. त्यासाठी पक्ष संघटन वाढीसाठी सर्वांनी काम करावे. पवार यांच्यासारखा चोवीस तास कार्यरत जाणता राजा मिळाल्यानंतर उर्मीने सर्वांनी कार्यरत राहावे. जळगाव जिल्ह्यात सहा आमदार निवडूण आण्यासाठी प्रयत्न करावे.

यावेळी शरद पवार म्हणाले, खानदेशात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या सुखदुःखात उभे राहण्याची तयारी ठेवावी, खानदेश हितासाठी झोकून काम करावे, पक्ष संघटन मजबूत करावे, राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेऊन खानदेशात बदल घडवावा आणि तो घडेल, असा विश्‍वास व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in