विरोधकांनाही माहित आहे, इथे नाथाभाऊ स्ट्रॉंग म्हणूनच बाजूला करण्याचे प्रयत्न सुरु...

Eknath Khadse | NCP : एकनाथ खडसेंना पुन्हा बाजूला सारण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप...
Eknath Khadse News, Jalgaon News
Eknath Khadse News, Jalgaon NewsSarkarnama

जळगाव : भोसरी जमिन खरेदी प्रकरणी या अगोदर झालेल्या चौकशीत कोणतेही तथ्य आढळले नाही, पण तरीही आता पुन्हा लाचलुचपत प्रतिबंध विभागातर्फे चौकशी करण्यात येत आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत आपण विरोधकांच्या विजयात अडचण ठरणार असल्याने आपला छळ करून मानसिक संतुलन बिघडविण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे.

राज्यात सत्तातंर झाल्यानंतर नवीन सरकारने भोसरी जमीन खरेदी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागातर्फे पुन्हा चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बोलतांना आमदार एकनाथ खडसे म्हणाले, या प्रकरणात यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करून काहीही तथ्य नसल्याचा अहवाल दिला आहे. या प्रकरणाची एफआयआर रद्द करावी असा क्लोजर रिपोर्ट पुणे सत्र न्यायालयात दीड वर्षापूर्वी दिला. नाशिक लाचलुचपत प्रतिबंध विभागाने चौकशी करून त्यात या प्रकरणी कोणतेही तथ्य नाही असा अहवाल दिला. माजी न्यायमूर्ती झोटींग यांच्या समितीने केलेल्या चौकशीत माझा या प्रकरणात काहीही संबध नाही असा अहवाल दिल्याचे मला समजले. पण आता ईडीच्या माध्यमातून ही चौकशी सुरू आहे, असा दावा खडसे यांनी केला.

Eknath Khadse News, Jalgaon News
मोठी बातमी : खोतकराचं अखेर ठरलं ; शिंदे गटात जायचं की ठाकरेंसोबत राहायचं!

एकदंरीत वारंवार नाथाभाऊंच्या मागे चौकशी लावून मानसिक छळ करण्याचा प्रकार सुरू आहे. विरोधकांना माहिती आहे, कि या विभागात एकनाथ खडसेच राजकीयदृष्टया बलाढ्य आहे, निवडणुकीतही तेच अडचण ठरणार आहेत. नाथाभाऊ बाजूला गेला कि यांना रान मोकळे मिळणार आहे. आता जनता हे सर्व पाहत आहे. माझ्यावर कोणताही आक्षेप आजपर्यंत नाही. भोसरी जमीन खरेदी प्रकरणाचा माझा कोणताही संबंध नाही, मी काही याला पैसे दिलेले नाही. माझ्या पत्नीच्या नावे खरेदी आहे. मात्र यात माझा कोणताही संबध नाही. त्यामुळे वारंवार चौकशी करून काहीही निघणार नाही, मात्र खोट्या प्रकरणात मला अडकविण्यात येत असेल तर काही सांगता येत नाही, असे आरोप एकनाथ खडसे यांनी केले.

Eknath Khadse News, Jalgaon News
अखेर मुख्यमंत्र्यांना अमित शहांची वेळ मिळाली; औरंगाबादवरुन रात्रीच दिल्ली गाठणार...

राज्यपालांकडून मराठी माणसाचा अपमान

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी मुंबईबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य हे मराठी माणसाचा अवमान आहे. असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. याबाबत ते म्हणाले की, हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे, विकासात त्याचे योगदान मोठे राहिलेले आहे. या ठिकाणी मराठी माणूस ग्राहक आहे, म्हणून हा व्यापार चालतो आहे. त्यामुळे एका दृष्टीने पाहिले तर मराठी माणसाचा हा अवमान आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in