भाजपच्या डोक्यात खडसेंचा गेम? : नाथाभाऊंना आमदार करण्याचा अजितदादांचा निर्धार

BJP | NCP | Ajit Pawar | Eknath Khadse : भाजपचे डाव की राष्ट्रवादीचे प्रतिडाव?
Ajit Pawar | Eknath Khadse | Devendra Fadnavais
Ajit Pawar | Eknath Khadse | Devendra Fadnavaissarkarnama

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला (Shivsena) गारद केल्यानंतर भाजपने (BJP) आता माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) आणि पर्यायाने एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर निशाणा लावल्याचे वृत्त आहे. विधानसभेतील विरोधपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यासाठीची सारी सूत्र त्यांचे विश्वासु सहकारी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याकडे सोपविली असल्याचेही सांगण्यात येत आहे. पण या पाडापाडीच्या राजकारणात राष्ट्रवादीचाच घात होऊ नये म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रणनीतीचा 'रिमोट' स्वत:कडे घेतला आहे. त्यामुळे खडसेंना पाडण्यासाठी छुपे डाव टाकण्याच्या तयारीतील फडणवीसांवर प्रतिडाव टाकून पवार हे खडसेंना विधान परिषदेत पाठवणार का, याची उत्सुकता आहे. (Eknath Khadse | Vidhan Parishad Latest News)

या निवडणुकीत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे 'सेफ' असल्याचे मानले जात आहे. त्यामुळेच खडसेंच्या कोट्यात आपल्या पक्षाच्या मंत्र्यांसह प्रमुख आमदारांची मते देण्याची खेळी पवार यांची आहे. भरवश्याच्या आमदारांची मते खडसेंच्या पारड्यात देऊन खडसेंची आमदारकी पक्की करण्याचा हा प्रयत्न असू शकतो. भाजपसह त्यांच्या साथीतील अपक्ष आमदारांना उपमुख्यमंत्री म्हणून पवार हे नेहमीच मदत करतात, त्याच्या परतफेडीपोटी दोन-चार आमदार पवारांचा शब्द खाली पडू देणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे.

Ajit Pawar | Eknath Khadse | Devendra Fadnavais
रामराजेंनीच माण तालुक्याला पाण्यापासून वंचित ठेवलं...जयकुमार गोरे

पुढच्या राजकारणाची बांधणी करीत, अजित पवार हे एरवी पक्षापलीकडे जाऊन आमदारांना 'बळ' देत असल्याचा दिसून येते. अशांना गळाला लावून पवार हे आणखी एक डाव टाकू शकतात. नाईक-निंबाळकरांना भाजपमधून काही मदत होण्याची चर्चा आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप-काँग्रेसमध्ये पाचव्या जागेसाठी टक्कर होत असली; तरीही फडणवीसांच्या डोक्यात खडसेंचा 'गेम' ठरला आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाचे गणित बिघडून कोणाला कसा फटका बसेल, याची हमी उरलेली नाही. (Eknath Khadse | Devendra Fadnavis Latest News)

मात्र, खडसेंना धोका झाल्यास पर्यायाने तो राष्ट्रवादी आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी धक्का मानला जाईल. हा धोका टाळण्याच्या हेतुने पवार यांनी गेल्या दोन दिवसांत विधान परिषदेची सारी सूत्रे आपल्याकडे घेऊन नवी रणनीती तयार केल्याचे समजते. ज्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून येतील. त्यामुळे खडसेंच्या पराभवासाठी महाविकास आघाडी त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही मतांवर डोळा ठेवून डाव रचलेल्या फडणवीसांवर पवारांच्या खेळ्या भारी पडण्याची चिन्हे आहेत.

Ajit Pawar | Eknath Khadse | Devendra Fadnavais
शिर्डीला जागतिक दर्जाचे शैक्षणिक केंद्र उभारणार!

त्याचवेळी भाजप नेत्यांच्या कुरघोडीचा खेळ जवळून पाहिलेले खडसेही काही कमी नाहीत. भाजप सोडल्यानंतरही त्या पक्षातील जुन्या समर्थकांशी अजूनही संबंध जोडून असलेले खडेसेही भाजपची एक-दोन मते फोडू शकतात. भाजपमधील काही आमदारांना फोडण्याची जबाबदारी खडसे आणि नाईक-निंबाळकरांकडे अधिकृतपणे दिल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे खडसेंना आमदार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांपासून अजित पवार, जयंत पाटील आणि प्रमुख नेते हालचाली करीत असतानाही, खडसे स्वत:च्या पातळीवरही विजयासाठी झटत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com