दूध संघाच्या चौकशीतील परदेशींना निलंबीत करा!

एकनाथ खडसेंचा आरोप, जबाब बदलण्यासाठी कर्मचाऱ्यावर पोलिसांचा दबाव
Eknath Khadse
Eknath KhadseSarkarnama

जळगाव : जिल्हा दूध संघातील (Jalgaon) तूप विक्रीबाबत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिस (Jalgaon Police investigation) तपास सुरू आहे. या प्रकरणातील पोलिस तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरिक्षक संदीप परदेशी (PI Sandeep Pardesi) कर्मचाऱ्यांवर जबाब बदलण्यासाठी दबाव आणत आहेत. त्यांना या प्रकरणातून हटवून निलंबित करावे, अशी मागणी आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केली. (NCP leader Eknath Khadse alligation on Police in Milk federation case)

Eknath Khadse
संजय राऊत यांच्या सुटकेने शिवसेनेचे मनोबल वाढले

याबाबत कर्मचाऱ्याने आपल्यावर दबाव आणल्याबाबत केलेल्या नोटरीची प्रतही त्यांनी सादर केली. त्यामुळे दूध संघाच्या गैरव्यावबाराबाबतचे प्रकरण चांगलेच गाजरत आहे.

Eknath Khadse
Bharat Jodo Yatra : सुप्रिया सुळेंनंतर आज आदित्य ठाकरे राहुल गांधींसोबत यात्रेत चालणार

जळगावातील मुक्ताई निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना त्यांनी सांगितले, की दूध संघातील कर्मचारी निखिल सुरेश नेहते यांनी या प्रकरणी जो जबाब दिला आहे. तो त्यांनी बदलावा, यासाठी त्याच्यावर पोलिस अधिकारी संदीप परदेशी दबाव आणत आहेत. त्याला संचालक मंडळा विरोधात जबाब द्यावा, असे सांगितले जात आहे. त्याने नकार दिल्याने त्याचे वडील व कुटुंबावरही दबाव आणला जात आहे. याबाबत आपण वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास त्यांच्याकडून काढून घ्यावा, तसेच त्यांना निलंबीत करावी, अशी मागणीही आपण केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली नाही, तर आपण परदेशी यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. या प्रकरणी कर्मचारी निखिल सुरेश नेहते यांनी नोटरी करून दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

कर्मचारी निखिल नेहेतेचा आरोप

कर्मचारी निखिल नेहते ही या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, की आपण दूध संघात बिलींग क्लर्क म्हणून कार्यरत आहोत. ‘बी’ ग्रेड तुपाबाबत आपण वरिष्ठांनी सांगितलेल्याप्रमाणे आपण बिलींग केले आहे. त्यावेळी एजन्सी चालक हरी पाटील उपस्थित होते. त्यानुसार आपण पोलिसांना जबाब दिला आहे. हा जबाब बदलण्यात यावा व संचालक मंडळाच्या आदेशानुसार आपण केल्याचे सांगावे, असा आपल्यावर दबाव आणण्यात आला. आपण नकार दिल्यावर आपल्या कुटुंबावर पोलिस अधिकारी संदीप परदेशी यांनी दबाव टाकल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com