एकटा नाथाभाऊ विरोधकांना पुरून उरलाय...

Eknath Khadse : नाथाभाऊला विरोध करणे हेच एकमेव काम विरोधकांकडे उरल आहे.
Eknath Khadse Latest News
Eknath Khadse Latest NewsSarkarnama

जळगाव : भाजप (BJP) सोडल्यापासून राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे सातत्याने भाजपवर टीका करताना दिसतात. त्यातही ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि जळगावमधील भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर टीका करण्याची संधी कधीच ते सोडत नाहीत. नुकतेच ते नाशिकमध्ये मंचावर आले मात्र त्यांच्याशी त्यांनी चार हात दुरच राहिल्याचे पाहायला मिळाले होते. आज पुन्हा एकदा खडसेंनी भाजप आणि शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष करत त्यांच्यावर टीका केली आहे.

गेल्या ४० वर्षांपासून मी जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय असून. या कालावधीत ३०-३५ वर्षे एकमेव एकनाथ खडसे हा विरोधकांसोबत लढणारा आणि समर्थपणे त्यांचा सामना करणारा एकमेव माणूस दिसतो. जळगाव जिल्ह्यात शून्यातून भाजप उभी राहिली आहे. यासाठी लोकांनी मला प्रचंड प्रतिसाद दिला आहे. यामुळे अनेक आमदार, खासदार निवडून आले असून. हे पक्षाचं यश तसेच नेतृत्वाचेही यश आहे, असे मत खडसेंनी व्यक्त केले. (Eknath Khadse Latest News)

Eknath Khadse Latest News
जे ठाकरे,पवारांना जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं...

खडसे म्हणाले, मी सातत्याने ३० वर्षे निवडून आलो असून आता पुन्हा ६ वर्षासाठी आमदार झालो आहे. त्यामुळे ३६ वर्ष जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली असून जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आहे. मात्र विरोधकांना वाटत की नाथाभाऊला नाउमेद केल्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही. जिल्ह्यात जिल्हा बँका, जिल्हा दूध संघ आणि अन्य ठिकाणी विरोधकांना अपयश आल्याचा उल्लेख करून त्यांनी भाजपला डिवचलं. आता सारे विरोधक एकवटून नाथाभाऊला विरोध करणे हेच एकमेव काम विरोधकांकडे उरलयं, मात्र जोपर्यंत जनता माझ्या पाठिशी आहे. तोपर्यंत त्यांना यश मिळणार नाही, असा टोलाही खडसेंनी लगावला आहे.

Eknath Khadse Latest News
'ये मीठा है, ओ कडू है', बच्चू कडूंबद्दल सत्तार असे का म्हणाले, करावं लागल स्पष्ट

दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षावर बोलताना ते म्हणाले की, राज्याच्या सत्तासंघर्षाचं प्रकरण हे कोर्टात असून अद्याप त्यावर कुठलाही निकाल लागला नाही. यामुळे राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार लांबवावा लागला होता. मात्र, अद्यापही पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या नाही. त्यामुळे राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री लवकर द्यावे,अशी सदबुद्धी मुख्यमंत्री शिंदे यांना गणरायानी द्यावी, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com