एकनाथ खडसे सत्कार न स्विकारता तातडीने मुंबईला रवाना

कार्यकर्त्यांतर्फे रस्त्यातच सत्कार, कोणतेही भाष्य करण्यास खडसेंचा नकार
Eknath Khadse with NCP workers
Eknath Khadse with NCP workersSarkarnama

जळगाव : विधान परिषद आमदारपदी निवड झाल्याबद्दल एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात (NCP) सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र हा सोहळा रद्द करून ते तातडीने मुंबईकडे पक्षाच्या बैठकीसाठी रवाना झाले. (NMC MLC Eknath Khadse move to Mumbai for party meeting)

Eknath Khadse with NCP workers
याद राखा, घोडामैदान दूर नाही ; सदाभाऊ खोतांचा ठाकरे सरकारला इशारा

राज्यातील विधानपरिषद निवडणुकीत एकनाथ खडसे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आमदारपदी निवड झाली आहे. खडसे विधानपरिषदेचे प्रथमच आमदार झाले आहेत, विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यात शिवसेनेत फुट पडल्यामुळे जोरदार राजकीय खळबळ उडाली आहेत. त्यामुळे सर्वच पक्षाचे राजकीय नेते मुंबईत होते. त्यामुळे खडसेसुध्दा मुंबईत होते.

Eknath Khadse with NCP workers
नॅाट रिचेबल भास्कर जाधव गुवाहटीच्या मार्गावर?

मात्र बुधवारी ते मुक्ताईनगरात परतले, त्यानंतर आमदार झाल्याबद्दल गुरुवारी त्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे जळगाव येथे सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनाही कार्यालयात सत्काराच्या कार्यक्रमासाठी पाचारण करण्यात आले होते. दुपारी बारा वाजता हा सत्कार होणार होता. त्याकरीता कार्यकर्ते जमले होते.

कार्यक्रमास एकनाथ खडसे आले, मात्र सत्काराचा कार्यक्रम रद्द झाला. मुंबई येथे सायंकाळी पाच वाजता पक्षाच्या आमदारांची बैठक पक्षाचे नेते शरद पवार यांनी आयोजित केली असल्याने आपल्याला तातडीने मुंबईला पोचायचे असल्याचे खडसे यांनी सांगितले. त्यावेळी पक्षाचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, सुनील माळी तसेच आदी कार्यकर्त्यांनी त्यांचा वाहनातच पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. त्यानंतर खडसे तातडीने मुबंईकडे रवाना झाले. यावेळी सद्याच्या राजकीय परिस्थितीवर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com