खडसेंना ED नोटीस : कथित भूखंड गैरव्यवहार प्रकरणी सगळी संपत्ती हवाली करावी लागणार!

Eknath Khadse | ED : एकनाथ खडसे यांना ED ची नोटीस
खडसेंना ED नोटीस : कथित भूखंड गैरव्यवहार प्रकरणी सगळी संपत्ती हवाली करावी लागणार!
Eknath Khadse News in Marathi, NCP Marathi news updatesSarkarnama

मुंबई/जळगाव : भोसरीतील भूखंड खरेदीतील कथित गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khades) यांना ईडीने नोटीस बजावली आहे. खडसे यांच्यासह पत्नी व जावई यांच्याविरुद्ध कारवाईत ‘ईडी’ने यापूर्वी पीएमएलए अंतर्गत जप्त केलेल्या ११ मालमत्ता रिक्त करण्याबाबत खडसेंना नोटीस बजावली आहे. मुंबई, नाशिक, पुणे, जळगाव, लोणावळा, सूरत येथील फ्लॅट्स, बंगले, भूखंड, जमिनी आदी मालमत्ता रिकाम्या करण्याबाबत ही नोटीस बजावण्यात आली आहे. खडसे यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. खडसे यांच्यासह इन्शिया मुर्ताझा बादलावाला, उकानी हेही सर्व या मालमत्तांचे मालक आहेत. (Eknath Khadse latest news)

ऑगस्ट २०२१ मध्ये ईडीने या मालमत्ता जप्त केल्या होत्या. नोटीस मिळाल्यापासून १० दिवसांच्या आत संबंधित मालमत्ता रिकाम्या करण्यात याव्यात, असे आदेश या नोटिसीअंतर्गत देण्यात आले आहेत. तसे न झाल्यास कायदेशीररित्या या मालमत्ता रिकाम्या करण्याचा अधिकार संचालनालयाकडे असेल, असेही नमूद करण्यात आले आहे. याशिवाय संबंधित मालमत्ता हस्तांतरण, विक्री, भाडेकरारावर देण्यास परवानगी दिली जाऊ नये, असेही नोंदणी महानिरीक्षक तसेच नाशिक, पुणे, मुंबई, जळगाव, सूरत येथील जिल्हाधिकाऱ्यांनाही कळवण्यात आले आहे.

भोसरी (पुणे) येथील भूखंड खरेदीत पदाचा गैरवापर व बनावट कंपन्यांद्वारे पैसा फिरवून आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपाप्रकरणी ‘ईडी’ने एकनाथ खडसेंसह त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, जावाई गिरीश चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. गिरीश चौधरी या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असून त्यांना अद्यापही जामिन मिळू शकलेला नाही. मंदाकिनी खडसेंसह स्वत: एकनाथ खडसेंवर यांची ईडीने चौकशीही केली आहे. त्यांच्यावर अटकेची कारवाई करु नये यासंबंधी निर्देश देत न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे. (Eknath Khadse News in Marathi)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in