
Jalgaon Earthquake News : जळगावमध्ये राजकीय भूकंप कायम होत असतात. मात्र आज खऱ्या भुकंपाने जळगाव हादरल्याचे पाहायला मिळाले. भुसावळ,सावदा परिसरात भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले. उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी याबाबत माहिती देत परिसरातील नागरिकांना शांततेचे तसेच सतर्कतेचे आवाहन केले आहे.
आज सकाळी १०.३५ च्या सुमारास भुसावळ, सावदा परिसरात ३.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे झटके जाणवले. यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती, मात्र यात कोणतीही जिवीत वा वित्तहानी झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच भुसावळ परिसरात असलेल्या हतनूर धरणाला कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले. जनतेने कोणत्याही प्रकारे घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तसेच शहरातील गडकरीनगर ग्रीन पार्क, विठ्ठलमंदिर वार्ड, शनि मंदिर वार्ड, वांजोळा रोड, बाजारपेठ परिसरातही भुकंपाचे धक्के बसल्याचे नागरिकांनी सांगितले. घरे हादरु लागली, शिवाय एखादी वस्तू मोठ्याने पडल्यावर जसा आवाज येतो, तसा आवाजही आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. तर भूकंपाचे धक्के जाणवू लागल्यानंतर लोक इमारतींमधून बाहेर पडल्याचे त्यांनी सांगितले.
पण भूकंपाचे धक्के पुन्हा जाणवल्यास त्यापासून बचाव करण्याच्या सूचना शासकीय पातळीवर देण्यात आल्या आहे. तसेच भूकंपाचा धक्का बसल्यानंतर परिसरात उलटसुलट चर्चाना उधाण आले होते. याशिवाय अफवांवर विश्वास ठेऊ नका, धक्का जाणवताच लगेच घराच्या बाहेर पडा, प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करा, अशा सुचना माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिल्या आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.