उपसचिव गंगाधरन डि नाशिकचे नवे जिल्हाधिकारी

विद्यमान सुरज मांढरे नव्या बदली आदेशाच्या प्रतिक्षेत
Gangadharan D.
Gangadharan D.Sarkarnama

नाशिक : नाशिकच्या (Nashik) जिल्हाधिकारीपदी (Collector) २०१३च्या बॅचचे आयएएस तथा मुख्यसचिव कार्यालयाचे उपसचिव गंगाधरन डी (Gangadharan D) यांची बदली झाली आहे. आज श्री. गंगाधरन यांच्या नियुक्तीचे आदेश पारित झाले. जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Suraj Mandhare) यांच्याकडे अद्याप कुठलाही पदभार दिलेला नाही, परंतू मुख्यमंत्री कार्यालयात किंवा पुणे येथे शिक्षण भागात त्यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे.

Gangadharan D.
१८२ कोटींची वसुलीत संचालकांना सहकारमंत्र्यांचा तत्पुरता दिलासा!

श्री. मांढरे यांना नाशिकच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारून शनिवारी तीन वर्षे होण्या अगोदर तीन दिवसांपूर्वीच त्यांची बदली झाली. १२ मार्च २०१९ ला श्री. मांढरे नाशिकला बदलून आले. गेल्या काही दिवसांपासून मांढरे यांच्या बदलीची चर्चा होती.

Gangadharan D.
भाजप कट, कॅापी करण्यात खुप माहीर आहे!

स्वतः श्री. मांढरे यांनी त्यास दुजोरा देखील दिला. श्री.मांढरे यांच्या तीन वर्षाच्या कालखंडातील दोन वर्षे कोरोनाशी दोन हात करण्यात गेले. सेवा अधिनियम कायद्याची नाशिकमध्ये प्रभावी अंमलबजावणी केली. सरकारच्या १०८ सेवा त्यांनी सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिल्या. श्री मांढरे यांनी स्वतः: पुढाकार घेत आपल्या चाळीस अधिकारी सहकारींच्या मदतीने कोरोनाने दोन्ही पालक गमावलेल्या ५८ बालकांना दत्तक घेतले. या उपक्रमाची राज्य शासनाकडून दखल घेण्यात येऊन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in