अजित पवार बदलणार आज भुसावळ पालिकेतील राजकीय समीकरणे

अजित पवारांच्या उपस्थित २२ नगरसेवक घेणार राष्ट्रवादीत प्रवेश.
अजित पवार बदलणार आज भुसावळ पालिकेतील राजकीय समीकरणे

Dy CM Ajit Pawar

Sarkarnama

भुसावळ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. भुसावळ शहरात विविध विकासकामांचे उद्‌घाटन व लोकार्पण त्यांच्या हस्ते होत आहे. विशेष म्हणजे डी. एस. मैदानावर होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यात तब्बल २२ नगरसेवक राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करणार असल्याने आगामी काळात पालिकेत समीकरणे बदलणार आहेत.

<div class="paragraphs"><p>Dy CM Ajit Pawar</p></div>
अजितदादांच्या स्वागतासाठी विश्रामगृहावर उडाली झुंबड

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी जळगावला आगमन झाले. यावेळी त्यांचे अतिशय उत्साहात स्वागत झाले. एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर अजित पवार यांचा हा पहिलाच दौरा आहे. श्री. खडसे यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यातच राजकीय हादरे देऊन राजकीय वातावरण तापवले आहे.

<div class="paragraphs"><p>Dy CM Ajit Pawar</p></div>
सरपंच एकवटले; निविदांचा खेळ थांबवा, `नासाका` सुरु करा!

भुसावळला अठरा विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेणार आहेत. हा जळगाव जिल्ह्यात जळगाव महापालिकेनंतरचा भाजपला मोठा धक्का मानला जातो. पहिला धक्का शिवसेनेचा व आज राष्ट्रवादी काँग्रेसचा धक्का भाजप कसा सहन करते व काय प्रतिक्रीया देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी साडेबाराला जुना सातारा भागातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. या वेळी भुसावळ पालिकेच्या विविध विकासकामांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन पवार यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. लोकार्पण सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास उपस्थितीचे देण्याचे आवाहन नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष राजेंद्र नाटकर व मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी केले आहे. शहरातील आरपीडी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर दुपारी एकला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे. मेळाव्यात भुसावळ शहर विभागातील पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. भुसावळ शहरातील १८ विद्यमान तर चार माजी नगरसेवक यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.