भाजपची झोप उडाली...महापालिका भ्रष्टाचाराची होणार चौकशी!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात केली घोषणा.
भाजपची झोप उडाली...महापालिका भ्रष्टाचाराची होणार चौकशी!
Ajit PawarSarkarnama

नाशिक : गेल्या पाच वर्षांपासून महापालिकेत (NMC) भाजपची (BJP) सत्ता असून, सत्तेच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार (Corruption) झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) मेळाव्यात झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात चौकशी करण्याची घोषणा केली. त्यामुळे भाजपची झोप उडण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar
जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या!

यानिमित्ताने श्री. पवार यांच्या घोषणेनंतर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपबरोबरच शिवसेनेसमोरही दंड थोपटले. त्यामुळे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तयारी सुरु केल्याचे चित्र आहे.

Ajit Pawar
संसार उभारायला अक्कल लागते, धुडगूस घालायला नाही!

नाशिक दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवनात शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापालिकेतील राष्ट्रवादीचे माजी गटनेते गजानन शेलार यांनी भाजपच्या सत्ताकाळात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा करून विरोधी पक्ष शिवसेनाही यात सहभागी आहे. मिलीजुलीतून टक्केवारीचे अनेक व्यवहार झाल्याचा आरोप केला. श्री. पवार यांनी तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी होणार असल्याचे जाहीर केले. महापालिकेतील टक्केवारीची चौकशी होईल. भाजपच्या हातात सत्ता होती.

भाजपने सत्तेचा वापर विकासाऐवजी पैसे मिळविण्यासाठी केला. आता हाच पैसा निवडणुकांमध्ये वापरला जाईल. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही बाब लोकांच्या निदर्शनास आणून दिली. श्री. शेलार यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपला शिवसेनेची साथ मिळाल्याचा आरोप करताना प्रभागरचनेत राष्ट्रवादीला डावलल्याची खंत व्यक्त केली.

शिवसेनेने सोयीचे प्रभाग तयार केले. महाविकास आघाडीची सत्ता असूनही विचारात घेतले जात नाही. राष्ट्रवादीने स्वतंत्र निवडणूक लढविण्याची मागणी करताना सत्तेपर्यंत पोचण्याचा दावा केला. राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या जागा शिवसेनेकडून मागणी होत असल्याचे श्री. शेलार यांनी निदर्शनास आणले. माजी आमदार अपूर्व हिरे यांनीही शिवसेनेसोबत आघाडी नको, अशी भूमिका घेतली, तर ज्येष्ठ नेते नानासाहेब महाले यांनी शिवसेनेसोबत आघाडीचे समर्थन केले. शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी शहराच्या सद्यःस्थितीची माहिती दिली.

नियमांच्या चौकटीत गुन्हे माघारी

महिला आघाडीच्या शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी राजकीय गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. त्याला उत्तर देताना श्री. पवार म्हणाले, की राजकीय गुन्हे मागे घ्यायला हरकत नाही. मात्र, आंदोलन करताना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले असल्यास गुन्हे मागे घेण्यात अडचणी आहेत. नियमाच्या चौकटीत राहून मार्ग काढण्याचे आश्‍वासन दिले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.