कायदा मोडणाऱ्यांना डीएसपी एम. राजकुमार यांची तंबी

पोलिसींग करा पण, सामान्य माणसाला त्रास नको, एसपींकडून अधिकाऱ्यांना कानमंत्र.
M. Rajkumar
M. RajkumarSarkarnama

जळगाव : कायदा मोडणाऱ्यांना माफी नाहीच. (NO exemption to Breaking of law) पण, सामान्य नागरीकांना (Shall Not trouble to normal citizen) कुठलाही त्रास व्हायला नको असा कानमंत्र जिल्‍हा पोलिस अधीक्षक (DSP) एम. राजकुमार (M. Rajkumar) यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिला आहे. मुख्यालयाच्या मंगलम सभागृहात आयोजित गुन्हे आढावा बैठकीत (Crime review meeting) जिल्ह्यातील गुन्हेगारी कृत्यांचा आणि एकूणच पोलिसदलाचा (Police) आढावा घेताना ते बोलत होते. ऐरवी तीन-चार तास चालणारी बैठक आज तब्बल आठ तास मॅरेथॉन पद्धतीने सुरु होती. (Policing mustbut do not harassment to ordinery people)

M. Rajkumar
एकनाथ खडसे विरुद्ध भाजप -शिंदेगट लढत रंगणार

जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी जिल्ह्याचा पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी जिल्ह्यातील प्रभारी अधिकाऱ्यांसह वरिष्ठ सहकाऱ्यांच्या उपस्थितीत गुन्हे आढावा बैठक घेतली.

M. Rajkumar
आमदार जयकुमार रावल यांना अटक करा!

अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंता, डीवायएसपी संदीप गावित यांच्यासह आठही उपविभागातील डीवायएसपी आणि ३५ पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी बैठकीला हजर होते. जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांचा आढावा घेतल्यानंतर एकूणच वाढत्या गुन्हेगारीसह असामाजिक तत्त्व आणि समाजकंटकासह आपल्या पोलिस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रभावीपणे प्रतिबंधात्मक कारवाई राबविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

अधीक्षकांनी यावेळी अक्षरशः कायदा मोडणाऱ्यांना तंबी दिली. त्यांनी रॅश ड्रायव्हिंग, टारगट तरुणांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या. सराईत गुन्हेगारांची हद्दपारी तसेच संघटीत गुन्हेगारांबाबत `एमपीडीए`वर काम करण्याचे सांगून अधिकाऱ्यांनी स्वतःच कायद्यासह नियमात वागल्यास अप्रिय घटना टाळता येणे सहज शक्य होईल.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com