Hemant Godse news | Niphad dry port news
Hemant Godse news | Niphad dry port newsSarkarnama

ड्रायपोर्ट निफाडबाहेर जाणार नाही, यावर शिक्कामोर्तब!

नाशिकच्या अन्य पर्यायी जागांना निफाडच्या लोकप्रतिनिधींचा विरोध!

नाशिक : निफाड (Niphad) येथील साखर कारखान्याच्या जागेवरच प्रस्तावित ड्रायपोर्ट (Dryport) प्रकल्प उभारण्याच्या कामाला आता पुन्हा गती आली आहे. निफाड साखर कारखान्याच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर देणी असल्याने जागेवर ड्रायपोर्ट उभारणी संदर्भातील कामकाज गेल्या चार वर्षांपासून रखडले होते. लोकप्रतिनिधींच्या रेट्यामुळे त्याला पुन्हा गती आली आहे. (Niphad dry port news)

Hemant Godse news | Niphad dry port news
युक्रेनमधून परतलेल्‍या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत महिन्‍याभरात निर्णय होणार!

निफाड येथील प्रास्तावित जागेवर ड्रायपोर्ट प्रकल्प उभारणे अशक्य असेल आणि सदर प्रकल्प जिल्ह्याबाहेर जाऊ नये, यासाठी नाशिक परिसरातील इतर पर्यायी जागांचा विचार करावा, अशी आग्रही मागणी गेल्या वर्षी खासदार हेमंत गोडसे यांनी ड्रायपोर्ट प्रशासनाकडे केली होती. यासाठी नाशिक परिसरातील इगतपुरी आणि शिलापूर येथील जागांची पाहणीही प्रशासनाने केली होती. (Hemant Godse news updates)

Hemant Godse news | Niphad dry port news
प्रसिद्धीसाठी आक्षेपार्ह विधाने करण्यात रावसाहेब दानवे माहीर!

दळणवळणासाठी वरील दोन्ही जागा योग्य असल्याने नाशिक येथे ड्रायपोर्ट प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला होता. खासदार गोडसे (Hemant Godse) यांनी सुचवलेल्या पर्यायी जागांचा शासन-प्रशासन गंभीरपणे विचार करत असल्याचे लक्षात येताच निफाड तालुक्यातील लोकप्रतिनिधींना जागा आली होती. प्रस्तावित निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जागेवरच ड्रायपोर्ट प्रकल्प व्हावा, यासाठी निफाड तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी पुन्हा प्रयत्न सुरू केले होते. यातूनच ड्रायपोर्ट प्रकल्प पुन्हा प्रस्तावित निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जागेवरच करण्यासाठी आता प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

ड्रायपोर्ट सारखा मोठा आणि शेतकऱ्यांसाठी लाभदायक असलेला प्रकल्प जिल्ह्याबाहेर जात नसल्याने समाधान असून निफाड येथील साखर कारखान्याच्या जागेवर ड्रायपोर्ट उभारणीच्या प्रस्तावाला लवकरात लवकर केंद्र शासनाकडून मान्यता मिळावी यासाठी जोमाने प्रयत्न करणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com