‘ड्रायपोर्ट’, हाय स्पीड रेल्वे प्रकल्प गुजरातला जातील

पाच वर्षांनी रेल्वेने या प्रकल्पाला नापसंती दर्शवली, एवढे दिवस रेल्वे मंत्रालय झोपले होते का?
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

नाशिक : नाशिक-पुणे (Nashik-Pune) सेमी हाय स्पीड रेल्वे (Semi high speed project) प्रकल्प रद्द होण्याच्या टप्प्यावर आहे. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर गेल्या ६ महिन्यांपासून हा प्रकल्प रेल्वे मंत्रालयाच्या (Railway ministry) अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. आता रेल्वे मंत्रालयाला अचानक हा प्रकल्प योग्य नसल्याचा साक्षात्कार झाला. वेगवेगळ्या मंजुऱ्यांसाठी ५ वर्षांचा कालावधी गेला. एवढे दिवस रेल्वे मंत्रालय झोपले होते का? असा संतप्त सवाल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला. (Chhagan Bhujbal said many projects shifting to Gujrat is a big issue)

Chhagan Bhujbal
Eknath Shinde : खान्देशना लोके पक्का दिलदार शेतस, मूठभर लेतस आणि तगारीभर देतस !

श्री. भुजबळ यांच्या उपस्थितीत रानवड साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सुरवात झाली. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, एअरबस प्रकल्पाचे काम जेव्हा टाटा यांना मिळाले त्यावेळी सर्वात प्रथम टाटा यांना पत्र लिहून नाशिकच्या एचएएल मध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ हा प्रकल्प नाशिकला द्या अशी विनंती केली होती. मात्र हा प्रकल्प आता महाराष्ट्राबाहेर गेला आहे. त्याबद्दल अतिशय दु:ख असून महाराष्ट्रातील नागरिकांसाठी ही अतिशय चिंतेची बाब आहे.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal: `जरा धीर धरा आपले दिवस परत येतील`

निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जागेवर ‘ड्रायपोर्ट’ करणार असे गेल्या काही वर्षांपासून केवळ आपण ऐकत आलो आहे. ते ही आता गुजरातला गेले तर आश्चर्य वाटायला नको असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

ते म्हणाले की, नाशिक-पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प रद्द होण्याच्या टप्प्यावर आहे. या रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने २० टक्के वाटा उचलण्याला मंजुरी दिली होती. राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांच्या भागीदारीतून महारेल या स्वतंत्र कंपनीची निर्मिती करण्यात आली. हे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर गेल्या ६ महिन्यांपासून हा प्रकल्प रेल्वे मंत्रालयाच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. आता रेल्वे मंत्रालयाला अचानक हा प्रकल्प योग्य नसल्याचा साक्षात्कार झाला. त्यांना वेगवेगळ्या मंजुऱ्यांसाठी ५ वर्षांचा कालावधी गेला. एवढे दिवस रेल्वे मंत्रालय झोपले होते का ? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले की, समाजकारण राजकारणात काही लोक पुढे होऊन काम करत असतात त्यांना सुरक्षा पुरविली जात असते. अशावेळी सुरक्षा काढणे योग्य नाही. याचा पुनर्विचार शासनाने करावा असे त्यांनी सांगितले.

यावेळी विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार दिलीप बनकर यांनी केले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in