मंदसौर ड्रग्ज्‌चे माहेर, तर भुसावळ बनले जंक्शन..!

पाकिस्तानातून राजस्थान-मध्य प्रदेशमार्गे होतेय नशेची तस्करी
International Drugs racket

International Drugs racket

Sarkarnama

रईस शेख

जळगाव : जिल्‍हा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) मधील महिलेस अर्धा किलो हेरॉइनसह ताब्यात घेतल्यानंतर हेरॉइन (Heroine) पुरवणारा म्होरक्या सलीम खान शेरबहादूर खान (Salim Khan) यालाही बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्हा ड्रग्जचे माहेरघर बनला असून, महाराष्ट्रातील भुसावळ (Bhusawal) हे रेल्वे जंक्शन आता गुन्हेगारीपाठोपाठ ड्रग्ज तस्करांचेही जंक्शन बनले आहे.

<div class="paragraphs"><p>International Drugs racket</p></div>
या ड्रग्ज तस्करीपुढे ‘कार्डिलिया क्रूज’, आर्यन खान प्रकरण किरकोळ!

गुन्हे शाखेने रावेर येथून अटक केलेली अख्तरीबानो रउफ खान (वय ४५) ही महिला अनेक वर्षांपासून मध्य प्रदेश ते भुसावळ असा ड्रग्ज तस्करीचा धंदा करत असल्याची माहिती समोर आली आहे. तिला अर्धा किलो हेरॉइन देणारा भामटा सलीम खान शेरबहादूर खान (५५) मध्य प्रदेशातील मोठ्या ड्रग्ज उद्योगातील लहान कडी असून, मधुमेह, उच्च रक्तदाब, निकामी किडन्या अशा व्याधींच्या आडोशात ड्रग्जचा धंदा चालवत आहे. त्याला अटक होऊनही तपासी यंत्रणा तो सांगेल तितकेच त्याच्याकडून कबूल करवू शकते. थर्ड डीग्रीसारख्या प्रकाराचा त्याच्यावर वापर करता येत नसल्याने यंत्रणेचाही नाईलाज होतो आणि तपास कुठेतरी खुंटतो.

<div class="paragraphs"><p>International Drugs racket</p></div>
भुसावळचा बालेकिल्ला उध्वस्त ; आता गिरीश महाजन कोणता डाव टाकणार?

प्राथमिक चौकशीत त्याने मध्य प्रदेशातील शासकीय प्लॉटवर होणाऱ्या शेतीतून हा माल मिळवून त्यातून तयार करून पुढे पाठवल्याचे सांगितले. मात्र, याव्यतिरिक्त इतरही मार्गाने ड्रग्ज महाराष्ट्रात आणली जात असल्याचे एका जाणकाराने सांगितले.

आंतराष्ट्रीय मार्ग असा...

अफूची शेती व त्यातून वर्षाला कोट्यवधींची उलाढाल असलेल्या अफगणिस्तानात प्रामुख्याने अफूची शेती केली जात असून, त्यापासून उच्च प्रतीची हेरॉइन आणि ब्राउनशूगर तयार होते. समुद्री मार्गाने मुंबई आणि गुजरातला खेप उतरवली जाते. गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर सापडलेली हेरॉइन अशाच तस्करीच्या मार्गापैकी एक. मात्र, आता गुजरात आणि मुंबईवर गुप्तचर विभागासह एनसीबी (नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो)ची निगराणी वाढल्याने तस्करांनी पर्यायी मार्गाचा अवलंब केला आहे.

सीमावर्ती भागातून तस्करी

राजस्थानातील जैसलमेर, बाडमेर, बिकानेर, गंगानगर, अशा चार जिल्ह्यांचा साधारण एक हजार किलोमीटरचा परिसर पाकिस्तानच्या सीमावर्ती भागाशी संलग्न आहे. अफगणिस्तानमार्गे पाकिस्तान आणि तस्करीच्या माध्यमातून भारतात हेरॉइन, ब्राउनशूगर, चरस हे अमली पदार्थ आणणाऱ्यांची मोठी साखळी कार्यरत आहे. राजस्थानातील जैसलमेर आणि अजमेर येथून मध्य प्रदेश आणि तेथून महाराष्ट्रात या अमली पदार्थांची तस्करी करण्यात येते.

अशी होते ड्रग्जची निर्मिती

अफू हा मादक पदार्थ असल्याने भारतात त्याच्या लागवडीसाठी कायदेशीर परवानगी आवश्यक असते. औषधनिर्मितीसाठी काही राज्यांत शासकीय जमिनीवरच अफूच्या शेतीला परवानगी दिली जाते. नार्कोटिक्स ड्रग्ज ॲन्ड सायको ट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट-१९८५ अंतर्गत तशी तरतूद असून, कायदेशीर उत्पादनात भारताचा अव्वल क्रमांक लागतो. मध्य प्रदेश, राजस्थान, पश्‍चिम बंगाल, झारखंडमध्ये कायदेशीर परवानगी देत शासकीय नियंत्रणात आणि देखभालीत अफूची शेती करण्यात येते. तर उत्तराखंड, छत्तीसगडसह ईशान्येकडील राज्य बेकायदा लागवडीत आघाडीवर आहेत. बेकायदेशीररीत्या उत्पादन केलेल्या अफूच्या बोंडांना खास वयात आल्यावर उभ्या चिरा मारून बोंडाचा चीक संकलित करण्यात येतो. त्याच्यापासून शुद्ध हेरॉइन तयार केले जाते. या हेरॅाइनपासून नंतर ब्राउनशूगर, चरसची निर्मिती करण्यात येते. एक ग्रॅम हेरॉइनमध्ये निर्बंधीत औषधी (alprazolam, morphin, paracitamol, caffin) मिश्रित करून चार ते सहा ग्रॅम ब्राउनशूगर तयार होते.

---

अटकेतील सलीम बरीच माहिती खोटी सांगतोय. जप्त माल घरीच तयार केल्याचे त्याने सांगितले. मात्र, शासकीय प्रयोगशाळेतून प्युअरिटीचा अहवाल प्राप्त झाल्यावरच त्याच्या दर्जावरून माल कुठला आहे, याचा ठावठिकाणा लागणार आहे. विविध पथके या तपासात कार्यरत असून, आम्ही यातून निर्णायक यश मिळवू, अशी खात्री आहे.

-किरणकुमार बकाले, निरीक्षक, गुन्हे शाखा

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in