गावित यांनी एकनाथ खडसेंना चक्क मुख्यमंत्रीच केले?

जनजातीय गौरव दिनाचा कार्यक्रम उत्साहात झाला.
Eknath Khadse & Dr. Vijaykumar Gavit
Eknath Khadse & Dr. Vijaykumar GavitSarkarnama

नाशिक : येथील गोल्फ क्लब मैदानावर (Nashik) आदिवासी विभागामार्फत (Trible development) आयोजित जनजातीय गौरव दिन झाला. यावेळी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित (Dr. Vijaykumar Gavit) यांचे भाषण झाले. त्यात गावित यांनी मुख्यमंत्री (Chief Minister) म्हणून चक्क एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा उल्लेख केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. (Trible development Minister Gavit`s tongue sleep)

Eknath Khadse & Dr. Vijaykumar Gavit
धक्कादायक; पोलिस निरीक्षक प्रवीण कदम यांची आत्महत्या

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून देशभरातील आदिवासी समुदायाच्या कला संस्कृतीचे स्वातंत्र्यलढ्यातील, तसेच राष्ट्राच्या निर्मितीतील आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरणासाठी मंगळवारी आदिवासी विभागामार्फत आयोजित जनजातीय गौरव दिन व राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. १७

Eknath Khadse & Dr. Vijaykumar Gavit
१७ वर्षानंतर धानोरकर दाम्पत्यानी घडवली कलावतीची राहुल गांधींसोबत भेट...

आदिवासींच्या या सांस्कृतिक सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उशिरा दाखल झाले. ते व्यासपीठावर नसताना मंत्री विजयकुमार गावित यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामाची स्तुती करताना त्यांचा उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ खडसे म्हणून केला. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. आडनावात चुकी झाल्याचे लक्षात येताच नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा उल्लेख करत त्यांनी चुकीची दुरुस्ती केली.

यावेळी त्यांनी आदिवासींच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने महाराष्ट्रात आदिवासी समाज जनजाती आयोग स्थापन करावा, यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहे. वन हक्क दाव्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालय स्तरावर विशेष कक्ष लवकरच स्थापन करण्यात येणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी देखील आदिवासींच्या समस्या प्रखरतेने प्रशासनासमोर मांडून त्या मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

इतिहास समोर आणावा -डॉ. पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटायझेशनवर भर दिला आहे. याचा उपयोग करून आदिवासी समाजातील सर्व क्रांतिकारकांची माहिती गोळा करून संग्रहित करावी. हा संग्रहित इतिहास समाजाच्या आजच्या पिढीसमोर आदिवासी विभागाने आणावा. आदिवासी जिल्हा, तालुके विकसित करण्यासाठी शासन काम करत आहे. केंद्राच्या विविध योजना आदिवासी हितासाठी आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in