डॉ. सुवर्णा वाजे यांचा मृतदेह कोरोनाकाळात जमवलेल्या सॅनिटायरझने जाळला?

डॉक्टर पतीने नातेवाईकाच्या मदतीने घडवून आणला पत्नीच्या मृत्यूचा कट.
Dr Suvarna vaje & Dr Sandeep Vaje
Dr Suvarna vaje & Dr Sandeep VajeSarkarnama

नाशिक : महापालिकेच्या (NMC) वैद्यकीय अधिकारी (Medical officer) डॉ. सुवर्णा वाजे (Dr Suvarna Vaze) यांचा खून केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना आग लावण्यासाठी संशयित संदीप वाजे याने कोरोनाकाळात जमवलेल्या सॅनिटायझरचा वापर केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Dr Suvarna vaje & Dr Sandeep Vaje
‘पोकरा’ योजनेत सारा महाराष्ट्र उपाशी अन् कृषीमंत्री एकटे तुपाशी?

संदीप वाजेचा संशयित मावसभाऊ यशवंत म्हस्के यानेच संदीपला सॅनिटायझरचा वापर करण्याचा सल्ला दिल्याचे सांगत, पोलिसांनी न्यायालयाकडे म्हस्केच्या पोलिस कोठडीत आणखी सहा दिवसांची मुदतवाढ मागितली. डॉ. सुवर्णा वाजे यांनी आत्महत्या केल्याचा बनाव संशयितांनी संगनमताने केल्याचा संशय नाशिक ग्रामीण पोलिसांना आल्याने, दोघांचा मोबाईल संवाद व घटनेच्या दिवशी दोघांमध्ये झालेले तब्बल १२ ते १४ फोन कॉल यावरून हत्याकांडात म्हस्केचा महत्त्वाचा सहभाग असल्याने पोलिसांनी त्यास अटक केली.

Dr Suvarna vaje & Dr Sandeep Vaje
नाशिककरांचा निर्धार...संभाजीराजे तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्यासोबत!

न्यायालयाने त्याला बुधवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. मुदत संपल्याने पोलिसांनी म्हस्केला पुन्हा न्यायालयात हजर केले. या वेळी म्हस्के याने न्यायालयासमोर संदीप वाजेला डॉ. सुवर्णा यांची हत्या करण्यासाठी सॅनिटायजरचा वापर करण्याचा सल्ला दिल्याची कबुली दिल्याचे सरकारी वकील जयदेव रिके यांनी सांगितले. त्यामुळे आता डॉ. सुवर्णा वाजे यांना सॅनिटायजरचा वापर करून वाहनासह जिवंत जाळण्यात आले, की त्यांची हत्या करून वाहनाला आग लावण्यात आली, याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com