डॉ. शेफाली भुजबळांच्या चित्रांचे मुंबईत प्रदर्शन

सोमवारपासून मुंबई येथे आर्ट सोसायटीमध्ये चित्र प्रदर्शन सुरु होईल.
Dr Shephali Sameer Bhujbal
Dr Shephali Sameer BhujbalSarkarnama

नाशिक : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणजे राज्याच्या राजकारणातील बहुचर्चीत आणि दिवसभर राजकारणाच्या भरती- ओहोटीत व्यस्त असणारे व्यक्तीमत्व. मात्र त्यांच्या या राजकारणाच्या धबाडग्यातही आपली कला, आवड जोपासत त्यांच्या घरी रंगरेषांचे एक विश्व तेव्हढ्याच हळुवारपणे जोपासले गेले आहे, ते त्यांच्या स्नुषा शेफाली भुजबळ (Dr. Shephali Bhujbal) यांच्या चित्रांच्या रुपात. अनेकांना याचे आश्चर्य वाटू शकते. मात्र ही आश्चर्य, उत्सुकता शमविण्याची संधी आपल्याला सोमवारपासून मुंबईत भरणाऱ्या चित्र प्रदर्शनातून मिळेल.

Dr Shephali Sameer Bhujbal
धक्कादायक; देश शोकमग्न असताना चित्रा वाघ जल्लोषात सहभागी होत्या!

एम.ई.टी. भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉ. शेफाली भुजबळ यांनी रेखाटलेल्या चित्रांचे बांद्रामधील मुंबई आर्ट सोसायटीमध्ये सोमवारपासून (ता. २३) १९ डिसेंबरपर्यंत ‘अनावरणम्’ हे प्रदर्शन होईल. या सात दिवसात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल. चित्रप्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे डॉ. भुजबळ यांनी म्हटले आहे. आहे.

Dr Shephali Sameer Bhujbal
भाजप नेत्याच्या हत्येनंतर `राष्ट्रवादी`चा गुन्हेगारांना राजाश्रय!

डॉ. भुजबळ यांचे हे प्रदर्शन पहिले असली, तरीही अनेक वर्षापासून त्यांनी छंद आणि अभ्यास म्हणून चित्रकला जोपासली आहे. चित्रांच्या प्रकारात विशेषतः ‘ॲप्सट्रॅक पेंटींग' त्यांचा कल आहे. त्याची सुंदर अशी प्रचिती रसिक प्रेक्षकांना मिळणार आहे. मॅनेजमेंट या विषयात डॉक्टरेट केलेल्या शेफाली भुजबळ यांचा भरतनाट्य नृत्याचा अभ्यास आणि सराव आहे. मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या विद्यार्थी व ‘स्टाफ'च्या सर्वांगीण विकासात त्यांचे मार्गदर्शन लाभते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com