नितीन पिंगळे ठरले २६ भावंडांच्या कुटुंबातील पहिले डॉक्टर!

माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या कुटुंबात नऊ भाऊ व एक बहीण आहे. या नऊ भावांच्या कुटुंबात तेरा मुले व तेरा मुली आहेत.
नितीन पिंगळे ठरले २६ भावंडांच्या कुटुंबातील पहिले डॉक्टर!
design@apglobale.com

नाशिक : दरी (नाशिक) पंचक्रोशीतील राजकीय, सहकार, सामाजिक व शेती क्षेत्रात प्रतिष्ठा असलेल्या, (Pingle Family had a big reputation in political, cooperative & Social field) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी खासदार देविदास पिंगळे (Ex M.P. Devidas Pingle) यांचे चिरंजीव नितीन हे एम.डी. डॉक्टर झाले. (Nitin Pingle became the first M.D. Doctor in Family) तसे अनेक युवक वैद्यकीय क्षेत्रात आहेतच. मात्र डॉ. नितीन यांचे वैशिष्ठ्य म्हणजे ते २६ भावंडातील पहिले (He is first doctor in 26 Brothers & Sisters) व कुटुंबियांचे स्वप्न पूर्ण करणारे डॉक्टर म्हणून कौतुकाचा विषय आहेत.

Dr Nitin Devidas Pingle
Dr Nitin Devidas PingleSarkarnama

डॉ. नितीन यांनी सेंट पिटर्सवर्ग येथील आय. डी. पावलो विद्यापीठातून वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेतले. या अभ्यासादरम्यान त्यांनी अतिशय कष्ट घेतले. अगदी स्वतःचे जेवन देखील ते स्वतः बनवत असत. त्यानंतर त्यांनी भारतात मूत्रपिंड शाखेचे पदव्युत्तर (युरोलॉजी) शिक्षण पूर्ण करून एण. डी. डॉक्टर झाले. नुकताच या परिक्षेचा निकाल जाहीर झाल्याने पिंगळे कुटुंबियांसाठी तो आनंदा क्षण ठरला.

नितीन पिंगळे ठरले २६ भावंडांच्या कुटुंबातील पहिले डॉक्टर!
नांगरे पाटील अडचणीत ; सोमय्यांच्या तक्रारीचा मानवधिकार आयोग अहवाल मागविणार

दरी ( ता. नाशिक) येथील पिंगळे कुटुंबियांना मोठा राजकीय वारसा व प्रतिष्ठा ओह. (कै) आनंदराव पिंगळे हे दरीचे वीस वर्षे सरपंच होते. त्यांनी दौलतराव कडलग यांच्या मदतीने परिसरातील तेवीस गावांतील शेतकऱ्यांसाठी सेंट्रल गोदावरी को-ऑपरेटीव्ह सोसायटी स्थापन करून बागाईत पिके घेणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळवून दिले. ते अनेक वर्षे नाशिक पंचायत समितीचे सभापती होती. शेती हा त्यांचा मूळ पिंड असल्याने उत्तम प्रकारची शेती व दुग्ध व्यवसाय हे या कुटुंबाचे वैशिष्ठ्ये होते. आनंदराव पिंगळे यांच्यानंतर देविदास पिंगळे हे दरीचे सरपंच झाले. पुढे ते बाजार समिती, जिल्हा बँक, नाशिक सहकारी साखर कारखाना, राज्य सहकारी बँक, सेंट्रल गोदावरी आदी संस्थांसह महाराष्ट्र विधान परिषद व लोकसभेचे सदस्य देखील झाले.

माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या कुटुंबात नऊ भाऊ व एक बहीण आहे. या नऊ भावांच्या कुटुंबात तेरा मुले व तेरा मुली आहेत. या सव्वीस भावंडात नितीन हा पहिला डॉक्टर झाला. त्यामुळे कुटुंबच नव्हे तर राजकीय, सामाजिक क्षेत्रातही तो चर्चेचा विषय आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com