भारती पवार म्हणाल्या, होमिओपॅथी डॉक्टरांच्या पाठीशी!

जळगाव येथील 'कल्याणम्' परिषदेस डॅाक्टरांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Dr Bharti Pawar News
Dr Bharti Pawar NewsSarkarnama

जळगाव : भविष्यातील आरोग्यसेवा (Health services) मजबूत करण्यासाठी होमिओपॅथिक (Homeopathy) डॉक्टरांचे महत्त्वाचे योगदान असून, त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी केंद्रातून (Centre Government) प्रयत्न करेल, असे आश्वासन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी दिले. (Dr Bharti Pawar News)

Dr Bharti Pawar News
भाजप नगरसेविकेच्या पतीकडे १५ लाखांची खंडणी मागितली

जागतिक होमिओपॅथिक दिनानिमित्त संभाजी राजे नाट्यगृहात आयोजित एक दिवसीय परिषदेत त्या बोलत होत्या.

या वेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार चंदूलाल पटेल, होमिओपॅथीचे डॉ. प्रकाश भंगाळे, डॉ. सुभाष देशमुख, डॉ. रितेश पाटील, खामगाव येथील दादासाहेब कविश्वर, डॉ. संजयकुमार तिवारी, अकोला चामुंडा माता महाविद्यालयाचे संस्थापक पी. ई. (तात्या) पाटील आदी उपस्थित होते.

Dr Bharti Pawar News
जुगारी पोलिसाच्या चाकु हल्ल्यात सासरा ठार, पत्नी, सासु जखमी!

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी डॉक्टरांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले. आमदार गिरीश महाजन यांनी महाराष्ट्रातील पहिले होमिओपॅथिक महाविद्यालय जळगावात सुरू करण्यासाठी मी मंत्री असताना प्रयत्न सुरू केले होते. जळगावात महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय सुरू होणे, हे माझे स्वप्न असून, ते पूर्ण करण्यासाठी निश्चित प्रयत्न करेल आणि होमिओपॅथिक महाविद्यालय लवकरात लवकर जळगावला सुरू करेल, त्यासाठी केंद्राची मदतही घेईल, असे आश्वासन या वेळी दिले.

या वेळी डॉ. दादासाहेब कविश्वर यांना त्यांनी केलेल्या कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील सर्वात जुन्या असलेल्या होमिओपॅथिक महाविद्यालय, अकोला यांचाही गुणगौरव करण्यात आला. कोविड काळामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवेत वाहून घेतलेल्या डॉ. प्रफुल्ल विजयकर, डॉ. मिलिंद राव या डॉक्टरांचा दुर्दैवाने मृत्यू झाला त्यांच्या या गौरवशाली सेवेसंदर्भात बद्दल त्यांच्या कुटुंबीयांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

जिल्ह्यातील ३५ जणांचा गौरव

जळगाव जिल्ह्यातील ३५ होमिओपॅथिक डॉक्टरांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कल्याणम् २०२२ च्या दुपारच्या सत्रामध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद निकम यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. भूषण मगर यांनी सहकार्य केले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com