लोकांची कामे करा, प्रत्येक विभागात हेल्पलाइन सुरु करा!

डॉ. भारती पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
Dr. Bharti Pawar News, Nashik Latest Marathi News
Dr. Bharti Pawar News, Nashik Latest Marathi NewsSarkarnama

नाशिक : नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यस्तरीय (Maharashtra) हेल्पलाइन प्रमाणेच नाशिकला (Nashik) देखील हेल्पलाईन सुरु करावी. सर्व शासकीय विभागांनी २४ तास कार्यान्वित राहिल अशी आपली स्वतंत्र हेल्पलाइन प्रणाली सुरु करावी. त्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करून जनतेच्या तक्रारी व शंकांचे निरसन करावे. प्रशासनाने कामकाजाची दिशा ठरवून ॲक्शन मोडवर काम करावे, अशा सूचना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी दिल्या. (Centre minister of state Bharti Pawar taken Government officers meeting)

जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी डॉ. भारती पवार यांनी विविध विभागाच्या कामासंदर्भात आढावा बैठक घेतली.(Nashik Latest Marathi News)

Dr. Bharti Pawar News, Nashik Latest Marathi News
संजय राऊत करणार नाशिकला शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन!

डॉ.पवार म्हणाल्या, की वाढती कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी ट्रॅक सिस्टीम राबविण्यात यावी. सर्व शासकीय रुग्णालयांनी जास्तीत जास्त ट्रेसिंग व टेस्टिंगवर भर द्यावा. कोरोना लसीकरणात मालेगाव शहराची टक्केवारी खूप कमी शहरात जनजागृती मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी प्रयत्न करावे. ‘हर घर दस्तक’ मोहिमेच्या माध्यमातून जिल्हा शासकीय रुग्णालय, नाशिक महापालिका, मालेगाव महापालिका, ग्रामीण रुग्णालयांनी नागरिकांच्या लसीकरणबरोबर मुलांच्या लसीकरणासही गती द्यावी.(Dr. Bharti Pawar News in Marathi )

Dr. Bharti Pawar News, Nashik Latest Marathi News
दादा भुसेंच्या बैठकीत मोबाईल स्वीचऑफ अन् कडेकोट बंदोबस्तात!

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत आयुष्यमान कार्डचे वितरण करण्यासाठी गावपातळीवर मोहीम, शिबिरे राबवावित, जेणेकरून प्रत्येक नागरिकाला या योजनेचा लाभ मिळेल. तसेच गावागावात योगासनांचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. दत्तक बालक योजनेअंतर्गत अधिकाऱ्यांनी सहभाग वाढवावा तसेच पीएम केअर योजनेअंतर्गत जिल्ह्यात किती मुलांना लाभ देण्यात आला आहे. याबाबतचा आढावा केंद्रीय राज्यमंत्री डॉ.पवार यांनी यावेळी घेतला.

या बैठकीस जिल्हाधिकारी गंगाथरन डी., मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, सहायक जिल्हाधिकारी विकास मीना, उपवनसंरक्षक पंकज गर्ग, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ, उत्कर्ष दुधेडिया, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in