Bhagwat Karad: आपल्याकडे महागाई आहे, पण अमेरिकेएव्हढी नाही!

भागवत कराड म्हणाले, पंकजा मुंडे नाराज नाहीत.
Dr. Bhagwat Karad
Dr. Bhagwat KaradSarkarnama

नाशिक : देशात (India) महागाई (Inflation) आहे, हे मी मान्य करतो, मात्र अमेरिका, (USA) चीनच्या (China) तुलनेत आपल्याकडे महागाई कमी आहे, असे विधान केंद्रीय राज्यमंत्री डॅा. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी आज येथे केले. (Centre minister of state says we have reduce Fuel prices twice)

Dr. Bhagwat Karad
Maratha Reservation: एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाचा आवाज दाबला?

महानुभाव पंथीय साधू व समाजबांधवांचे अधिवेशन येथे सुरु आहे. त्याचा समारोप आज झाला. यावेळी ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशात रोज महागाई वाढते आहे. सामान्य नागिरकांना त्याचा त्रास होते. पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसचे दर सतत वाढत आहेत. सर्व वस्तूंवर जीएसटी लागू करण्यात आला आहे. त्यावर काय उपाययोजना करणार?. यावर ते म्हणाले, देशात महागाई आहे हे मी देखील मान्य करतो. मात्र अमेरिका, चीनच्या तुलनेत आपल्या देशात कमी महागाई आहे.

Dr. Bhagwat Karad
Devendra Fadanvis: ऋद्धपूर येथे मराठी भाषेचे विद्यापीठासाठी शासन सकारात्मक

ते म्हणाले, आम्ही दोन वेळा डिझेल, पेट्रोलचे दर कमी केले आहेत. राज्याचा जीएसटी हे सेसच्या नावाने लावले जात होते. आता सुट्ट्या मालावर जीएसटी लागणार नाही. सुट्या साहित्यावर कोणताही जीएसटी नाही. केवळ पॅकिंग साहित्यावर केवळ जीएसटी आहे. सुटे तेल विकायलाही निर्बंध नाही.

सर्व सण साजरे करा!

ते पुढे म्हणाले, संपूर्ण देशात गणेशाचे उत्साहात आगमन झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळे सण उत्साहात साजरे करायला सांगितले आहे.

डॅा. कराड म्हणाले, भाजप नेते राज ठाकरे यांना भेटले त्यातून पुढे काय समीकरण होईल हे माहीत नाही. आता राज्यात जनतेच्या मनातील सरकार आहे. हे सरकार विकास करणारं आहे. महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांत फक्त केंद्राकडे बोट दाखवलं. अन्य काहीही केले नाही. त्यांच्या सरकारमधील मंत्री माझं कुटुंब, माझी जबाबदारी सांभाळत राहिले. केंद्र सरकारने २०० कोटी लोकांना फुकट कोरोना लस दिली. त्यामुळे आता निवडणुका झाल्या तरी आम्हाला खात्री आहे की, भाजप आणि शिवसेनेचा शिंदे गट दोनशे पेक्षा जास्त जागा जिंकेल.

राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत आपल्याला ते कळेल. राज्यात डबल इंजिन सरकार आहे, त्याला केंद्राचा पाठिंबा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विकास करू.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com