Dr. Amol kolhe: खासदार कोल्हे रमले `शिवपुत्र संभाजी महानाट्या`च्या प्रचारात

खासदार अमोल कोल्हे यांच्या महानाट्याचे शनिवारपासून नाशिकला प्रयोग
Dr Amol kolhe with Tanishqa group
Dr Amol kolhe with Tanishqa groupSarkarnama

नाशिक : (Nashik) खासदार डॉ अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांच्याबाबत राजकीय कार्यक्रमांना अनुपस्थितीच्या विविध बातम्या येत आहेत. डॉ. कोल्हे मात्र सध्या नाशिकमध्ये आपल्या शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) प्रयोगात व्यस्त आहेत. सध्या ते विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन महानाट्याला प्रतिसाद देण्याचे आवाहन करीत आहेत. (Dr. Amol Kolhe busy in His play on Chhatrapati Sambhaji Maharaj in Nashik)

Dr Amol kolhe with Tanishqa group
Ahmednagar : विखेंच्या जागेवर पडळकरांचा डोळा; म्हणूनच काढला नामांतराचा मुद्दा !

छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास उलगडणाऱ्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यातून केवळ मनोरंजन नव्हे, तर नव्या पिढीपर्यंत खरा इतिहास पोचविण्याचा प्रयत्न आहे. येत्या २१ ते २६ जानेवारीपर्यंत रोज सायंकाळी सहाला या महानाट्याचा प्रयोग होणार आहे. त्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन या महानाट्याचा प्रसार-प्रचार करावा. विशेषतः आपल्या पुढील पिढीला हे महानाट्य आवर्जून दाखवावे, असे आवाहन महानाट्यात छत्रपती संभाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारणारे अभिनेता खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे.

Dr Amol kolhe with Tanishqa group
Telangana News : विरोधकांची मोठ बांधायला सुरुवात ; काँग्रेस वगळून तिसऱ्या मोर्चासाठी..

‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याच्या अनुषंगाने खासदार कोल्हे यांनी मंगळवारी ‘सकाळ’च्या कार्यालयात तनिष्का भगिनींशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.

‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी स्वागत केले. ‘सकाळ तनिष्का’ व्यासपीठाचे जिल्हा समन्वयक विजयकुमार इंगळे यांनी संयोजन केले.

दरम्यान, हे महानाट्य म्हणजे रोज वेगळा प्रयोग असे नसून, संभाजीराजांच्या जन्मापासून बलिदानापर्यंतचे कथानक यामध्ये रोज बघावयास मिळणार असल्याचे स्पष्ट करून श्री. कोल्हे म्हणाले, की कोरोनाकाळानंतर नव्या पिढीचे आदर्श बदलले आहेत. त्यांचे प्रबोधन करतानाच या महानाट्याच्या माध्यमातून आपण छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास नव्या पिढीपर्यंत पोचविणार आहोत. अगदी मुगले-आझमशी तुलना करता येईल, अशी ही भव्य-दिव्य कलाकृती असूनही तिकीटदरसुद्धा अगदी सर्वसामान्य प्रेक्षकांना परवडतील असेच आहेत.

कमी किमतीचे तिकीट काढले म्हणून शेवटच्या रांगेत बसणाऱ्या प्रेक्षकांनाही हा थरार अगदी जवळून अनुभवता यावा, यासाठी तब्बल दहा हजार प्रेक्षकांच्या मधून घोड्यावर बसून एन्ट्रीसारखे अनोखे प्रयोग या महानाट्यात बघावयास मिळतील. त्यामुळे जीवनात एकदाच घ्यावयाचे जे अनुभव असतात, त्याच धर्तीवर हे महानाट्य म्हणजे सर्वांसाठी अविस्मरणीय अनुभूती असेल, असा विश्‍वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

एखाद्या मोठ्या समूहाने, शाळांनी किंवा अन्य कुणीही गटाने तिकिटे घेतल्यास त्यांच्यासाठी खास व्यवस्थादेखील करता येईल. त्यामुळे ‘तनिष्का’ भगिनींनी याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन एकत्रित तिकीट बुकिंग करावे, महानाट्याचा जास्तीत जास्त प्रचार-प्रसार करावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. ‘सकाळ तनिष्का’ व्यासपीठाच्या सदस्यांसह ‘सकाळ’चे सहकारी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in